कोरोनाचे नवे ३ रुग्ण; दोन बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:37+5:302021-08-01T04:27:37+5:30

जिल्ह्यात ३१ रोजी अँटिजन चाचणीत हिंगोली १२, औंढा ४८, वसमत ७४, सेनगावात १४ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले ...

3 new corona patients; Heal two | कोरोनाचे नवे ३ रुग्ण; दोन बरे

कोरोनाचे नवे ३ रुग्ण; दोन बरे

Next

जिल्ह्यात ३१ रोजी अँटिजन चाचणीत हिंगोली १२, औंढा ४८, वसमत ७४, सेनगावात १४ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले नाही, तर कळमनुरीत ३४ पैकी सहयोगनगरात एक रुग्ण आढळला. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली १२, औंढा ३०, वसमत ३५, कळमनुरी १३३ चाचण्या करूनही कोणी बाधित नाही, तर सेनगावात ३५ पैकी सुलदली येथील दोन बाधित समोर आले. आज नवीन कोविड सेंटरमधून बरे झालेल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५,९९८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १५,५९२ जण बरे झाले, तर ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर एक जण अतिगंभीर असल्याने त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 3 new corona patients; Heal two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.