शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 18:53 IST

हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

ठळक मुद्देमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

हिंगोली : कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची सोमवारी पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन गावे २४ फेब्रुवारी निवडली जाणार होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यादी जाहिर करण्यात आली असून यामध्ये हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे. एकूण २३३ लाभार्थ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत १ लाख ५ हजार ६९० शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. अद्याप ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणीचे काम प्रलंबीत आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आधार जोडणीचे काम पुर्ण करावे असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड केली होती. मौजे समगा गावातील १४७ तर खरबी येथील ८६ असे एकूण २३३ लाभार्थ्यांची यादी सोमवारी संबंधीत गावात प्रसिध्द केली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. समगा व खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देवून सोमवारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव आदी उपस्थितत होते. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली भेटकर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी समगा याठिकाणी भेट देऊन प्रत्येक्ष पाहणी केली. यावेळी आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर समगा व खरबी याठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनीही भेटी देऊन पाहणी केली.४२३३ लाभार्थ्यांची बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात हिंगोली तालुक्यातील समगा गावातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अलाहाबाद बँक -१, बँक आॅफ इंडिया-२८, स्टेट बँक आॅफ इंडिया-२२, युनियन बँक आॅफ इंडिया-९६ असे एकूण १४७ लाभार्थी शेतकरी तर खरबी येथील बँक आॅफ बडोदा या बँकेमध्ये एकूण ८६ लाभार्थी शेतकरी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधीState Governmentराज्य सरकार