शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
3
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
4
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
5
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
6
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
7
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
8
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
9
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
10
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
11
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
12
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
13
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
14
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
15
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
16
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
17
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
19
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
20
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

१९५२ मुलींना मिळणार सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:53 IST

शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.शाळेतील मुलींची गळती थांबावी व शाळेत येताना विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्या अनुषंगानेच मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. लाभार्थी मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी ३ हजार ५०० रूपये रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते. सायकल खरेदी करण्यासाठी प्रथम लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. उर्वरीत १ हजार ५०० रूपये सायकल खरेदी केल्याची रीतसर पावती दाखल केल्यानंतर बँकेत जमा करण्यात येणार आहेत.शिक्षण विभागाकडून मानव विकासकडे लाभार्थी मुलींच्या याद्या वेळेत पोहोचत नाहीत. संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी सदर याद्या जिल्हा कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास मुलींनाही शैक्षणिक कालावधीत योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु याकामी दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण मुलींची पायपीट होते. सध्या माध्यमिक शिक्षण खात्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे येथील अनेक कामांचा खोळंबा उडत असल्याचे निदर्शनास येत आहे.माध्यमिक शिक्षण विभाग : निधी वर्गमुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाºया निधीस तांत्रिक मान्यता मिळाली आहे. १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांच्या खात्यावर लवकरच निधी वर्ग केला जाणार असून प्रक्रीया सुरू असल्याचे माध्यमिक शिक्षणच्या संबधित विभागातर्फे सांगण्यात आले. लाभार्थी मुलीच्या बँक खात्यावरच लाभाची रक्कम जमा होणार आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये हिंगोली ६६६, सेनगाव ६६६ तर औंढा नागनाथ ६२० एकूण १ हजार ९५२ लाभार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी