शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१८२२ बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:40 IST

महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकडे रेटा लावल्याचेही चित्र आहे. काही गावांत तर यासाठी दलाल सक्रिय असून याची तपासणी होणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकडे रेटा लावल्याचेही चित्र आहे. काही गावांत तर यासाठी दलाल सक्रिय असून याची तपासणी होणे गरजेचे आहे.जिल्हा कामगार कार्यालय हिंगोली येथे एप्रिल २०१८ अखेर ४ हजार ७७८ नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. परंतु अनेक कामगारांना योजनांची माहिती नसते. शिवाय त्यांना नोंदणीचे महत्त्वही माहिती नसल्यामुळे जिल्हाभरातील कामगार शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे बांधकाम किंवा इतर कामगारांनी कामगार कार्यालयात नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रभारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत ४७७८ बांधकाम कामगार आहेत. कार्यालयातील आकडेवारीवरून मोजकेच नोंदणीकृत कामगार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय खासगी कंत्राटदार कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कामगार कार्यालयात नोंदणीसाठी कामगारांना अडचणी येतात. शासनाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अवजारे खरेदीसाठी पाच हजारांचे अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगार ९० दिवस काम केल्याबाबतच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करीत आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुलांचे ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांकडे बांधकाम कामगारांची गर्दी होत आहे. परंतु त्यांच्या कामाचे दिवस कमी भरत असल्याने त्यांची धावपळ होत आहे.हिंगोली येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ४ हजार ७७८ बांधकाम कामगारांच्या नोंदी आहेत. कामगारांकडून आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसा