शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१७ गुन्हे दाखल आरोपीचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न; एमपीडीए अंतर्गत दाखवला कारागृहाचा रस्ता

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 25, 2023 20:11 IST

पोलिस अधीक्षकांनी पाठविला होता प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हिंगोली : नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे दाखल असलेल्या एकावर एम.पी.डी.ए.अंतर्गंत कारवाई करण्यात असून त्यास एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता.

अनिकेत बालाजी सुर्यवंशी (रा. दत्तनगर, नवा मोंढा, नांदेड) असे एम.पी.डी.ए. अंतर्गंत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचेवर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर व नांदेड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. वजिराबाद (नांदेड) पोलिसांनी त्याचेविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. तरीही तो सतत गुन्हे करीत होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे तो समाजासाठी धोकादायक बनला होता. या प्रकरणी त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए अंतर्गंत कार्यवाही करावी, असा प्रस्ताव आखाडा बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता. जी. श्रीधर यांनी प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हाधिकारी पापळकर यांनी अनिकेत सुर्यवंशी याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करीत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरोडा टाकण्याचा केला होता प्रयत्नअनिकेत सुर्यवंशी याने काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत महामार्गावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यास हिंगोली पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. आरोपीचे रेकॉर्ड तपासले असता नांदेड शहरात व जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, पिस्टल बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. 

वर्षभरात ३० जणांवर कारवाईपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गतवर्षी २६ ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला होता. त्यांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईची कडक भूमिका घेतली. समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या तब्बल ३० जणांवर एमपीडीए अंतर्गंत कार्यवाही करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली