येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा काम वाटप समितीचे अध्यक्ष राधाविनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ५ एप्रिल रोजी बैठक पार पडली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा आरटीपीसीआर प्रयोगशाळा, जिल्हा कोविड रुग्णालय, नवीन कोविड रुग्णालय, पॉलिटेक्निक बॉइज, गर्ल्स हॉस्टेल, लिंबाळा, तसेच वसमत, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालये आणि सेनगाव व औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय, डीसीएचसी सिद्धेश्वर व कौठा येथे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना एकूण २७ कामांचे वाटप करण्यात आले आहे. या सोसायट्यांमार्फत १५७ लोकांना बाह्ययंत्रणेद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये सफाई कामगारांची ११० पदे, डाटा एंट्री ऑपरेटरची २९ पदे, वॉर्डबॉयची १८ पदांचा यामध्ये समावेश आहे. या १५७ लोकांना सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांमार्फत बाह्ययंत्रणेद्वारे काम करण्यासाठी तीन महिन्यांसाठीचे आदेश दिल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्तांनी दिले आहेत.
१५७ जणांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST