शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्णाने घातला 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड, मुलाला गंभीर अवस्थेत नांदेडला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 22:01 IST

ही घटना वसमत शहरातील शहर पोलिस ठाण्याजवळ १४ मे रोजी दुपारी ४:१७ वाजता घडली.

रमेश वाबळे हिंगोली : रस्त्याने जात असताना पाठिमागून येवून अचानक मनोरूग्णाने एका बारा वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड मारला. ही घटना वसमत शहरातील शहर पोलिस ठाण्याजवळ १४ मे रोजी दुपारी ४:१७ वाजता घडली.

दुपारी ४ वाजेदरम्यान प्रणव विश्वनाथ मगर (वय १२, रा. बॅंक काॅलनी, वसमत) हा शहर पोलिस ठाण्याजवळील जि.प.मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने जात होता. दरम्यान, एक मनोरूग्ण या मुलाच्या पाठिमागून धावत आला व अचानक डोक्यात दगड मारून आलेल्याच दिशेने परत पळाला. दगडाचा जोराने मार लागल्याने प्रणव मगर हा जागेवरच कोसळला.

ही घटना लक्षात आल्यानंतर आजुबाजूंच्या नागरिकांनी प्रणवला तात्काळ वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर मार असल्याने डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला. प्रणव याच्यावर नांदेड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पोलिस घेताहेत मनोरूग्णाचा शोध...दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी सिसीटीव्हीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओचा आधार घेत त्या मनोरूग्णाचा शोध घेणे सुरू केले आहे. परंतु, १४ मे रोजी रात्री ९:३० वाजेपर्यंत तरी मनोरूग्णाचा शोध पोलिसांना लागला नव्हता.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbasmath-acवसमत