शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख विभागांत १३२४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:09 IST

जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधिकारी यायला तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधिकारी यायला तयार नाहीत.जिल्हा परिषदेत सर्वाधिक रिक्त पदांची संख्या आहे. यामध्ये वर्ग १ व २ च्या पदांचीच संख्या ८0 आहे. सामान्य प्रशासन-६, महिला व बालकल्याण-४, अर्थ-१, लघुसिंचन -१, ग्रामीण पाणीपुरवठा ७, आरोग्य-२0, पशुसंवर्धन-६, कृषी-३, शिक्षण-२७, समाजकल्याण-१, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ७ अशी वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांची ८0 पदे रिक्त आहेत. यात समाजकल्याण, शिक्षण मा., सामान्य प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा, म.व बालकल्याण, जिग्रावियंला आधीच प्रमुख नसताना गटविकास अधिकाºयांचीही बोंब आहे. गट बमधील ३0४ पदे रिक्त आहेत. यात प्रशासन अधिकारी, लघुलेखक, सहायक लेखाधिकारी, कृषी अधिकारी, अभियंता, आरेखक, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, अराजपत्रित, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सामवेश आहे. गट कमधील लिपिकवर्गीय तसेच आरोग, बांधकाम, कृषी, शिक्षण, यांत्रिकी आदी विभागातील तांत्रिक कर्मचाºयांसह ५७२ पदे रिक्त आहेत. तर परिचर, चौकीदार अशी वर्ग चारची १0५ पदे रिक्त आहेत.कृषीलाही घरघररिक्त पदाची घरघर आणखी एक महत्त्वाचा विभाग असलेला कृषीलाही लागली आहे. या विभागात १३७ पदे रिक्त आहेत. तीन तालुका कृषी अधिकारी नाहीत. शिवाय कृषी अधिकारी, कृषीसहायक, लिपिक, अनुरेखक आदींचीही मिळून सर्व १३७ पदे रिक्त आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातही रिक्त पदांवरून बोंब सुरू आहे. झालेल्या बदल्यानंतर केवळ निवडणूक उपजिल्हाधिकारी सोडले तर पुरवठा, सामान्य, निवासी, रोहयो, भूसंपादन ही उपजिल्हाधिकारी पदे रिक्त होत आहेत. त्यामुळे नवीन अधिकारी आल्याशिवाय यांना न सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारीअनिल भंडारी यांनी घेतला आहे. याशिवाय तहसीलदार २, नायब तहसीलदार ५, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी अशी १0६ पदे जिल्हाभरात रिक्त आहेत. या जिल्ह्याला केवळ ५२१ पदे असून त्यापैकी ४१५ भरलेली असल्याचे चित्र आहे.इतर विभागांप्रमाणे पोलीस यंत्रणेतही आधीच अपुरे मनुष्यबळ मंजूर असताना पोलीस निरीक्षक, सपोनि, फौजदारांची आठ पदे रिक्त आहेत. इतर मिळून रिक्त पदांचा आकडा १९ वर जातो.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली