शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत १२२९ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:54 IST

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाईन प्रवेशासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. १० जून आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशाकरिता १२२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणयाचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. परंतु पालकांच्या विनंतीनुसार परत १० जून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख करण्यात आली. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत वारंवार बदल करण्यात आला. जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी परत संधी उपलब्ध करून देत १० जून अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आॅनलाई अर्ज करताना पालकांनी पाल्यांची माहिती शासनाने दिलेल्या अटींचे पालन करून भरून घेण्याच्या तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्य प्रकारे मॅप करून भरलेल्या माहितीची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले होते. आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश नाकारणाऱ्यांवर आता शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी शिक्षण विभागाकडे काही पालकांनी प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे दखल घेत पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून १० जून पर्यंत १२२९ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर दिसून येत होते.मोफत शिक्षण हक्क कायदा आरटीई २५ टक्के अंतर्गतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन सोडत पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. आता दुसºया फेरीचे शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात २४५ विद्यार्थ्यांपैकी १५० जणांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदeducationशैक्षणिक