शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:45 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व सेनगाव हे तीन तालुके तर दुष्काळग्रस्तच जाहीर केले. या तालुक्यांतील टँकरचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांनाच दिलेले आहेत. तर इतर ठिकाणच्या उपायांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येतात. यंदा टंचाईची तीव्रता लक्षात घेता सध्याच ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यात कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या ठिकाणी तर सेनगाव तालुक्यातील जयपूर, सेनगाव, कहाकर खु., औंढा तालुक्यात काळापाणी तांडा आदी ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत.सेनगाव तालुक्यात ८ खाजगी टँकर सुरू असून १९ खेपा केल्या जात आहेत. यावर १४५७0 एवढ्या लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. कळमनुरी तालुक्यात १ खाजगी तर दोन शासकीय टँकरद्वारे ८ खेपा केल्या जात आहेत. यावर ४२१९ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे.जिल्ह्यात एकूण १८ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. त्यातील टँकरसाठी ८ असून उर्वरित टँकरव्यतिरिक्त आहेत. मागील काही दिवसांपासून अधिग्रहणाचे प्रस्ताव येण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी अधिग्रहणाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याने अनेक शेतकरी आपला स्त्रोत अधिग्रहण करू देण्यास नकार देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे काही गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याने लोकप्रतिनिधींनीही झपाट्याने कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातून होणारी ओरड थांबविण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाला असला तरीही उपायांना त्या प्रमाणात गती मिळाल्याचे चित्र दिसत नाही. आता उन्हाचा कडाका वाढत असल्याने उपायांसाठी प्रशासनास सज्ज व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई