आरटीपीसीआर चाचणीत खुशालनगर १, जिल्हा परिषद क्वार्टर १, शिवाजीनगर १, रिसाला बाजार ४, आर. के. कॉलनी १, सुराणा नगर १, करंजी १, मंगळवारा २, वंजारवाडा १, शास्त्रीनगर १, गाडीपुरा १, आंबेडकरनगर १, गोरेगाव १, मिलिंद कॉलनी १, पानकनेरगाव १, वसमत १, नवा मोंढा २, मेथा १, गयत्रीनगर १, एनटीसी १, बोराळा १, तोफखाना १, शास्त्रीनगर १, जिजामातानगर १, वसमत तालुक्यात सोमवार पेठ १, अकोली १, मालेगाव १, कळमनुरी तालुक्यात कांडली ५, नांदेड १, सोडेगाव २, गुंडलवाडी २ यांचा समावेश आहे. आज बरे झाल्याने डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये हिंगोली सामान्य रुग्णालयातील ३५, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील १६, कळमनुरीचे ३६, तर औंढ्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. एकूण ९० जण बरे झाले आहेत.
आज कळमनुरी तालुक्यातील एका ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यू ७५ वर पोहोचले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ५४९८ कोराेना रुग्ण आढळले असून, यापैकी ४९३४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले. सध्या ४८९ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ५ जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.