अरेरे, चेहऱ्यावर सुरकुत्या? आणि त्याही ‘या’ वयात?
अरेरे, चेहऱ्यावर सुरकुत्या? आणि त्याही ‘या’ वयात?

- मयूर पठाडे

वाढत्या वयाची जाणीव आपल्याला केव्हा होते? विशेषत: तरुणी आणि स्त्रिया तर आपलं वय लपवण्यासाठी किंवा आहे त्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी काय काय करीत असतात! चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागल्यावर मात्र अनेकांची; त्यातही अनेकीचंी ततफफ व्हायला लागते. आपण आता ‘म्हातारे’ झालोत ही जाणीव त्यांना पोखरायला लागते अणि आपल्या चेहºयाच्या सौंदर्यासाठी महिला अधिकाधिक लक्ष द्यायला लागतात. जो कोणी जे काही सांगेल किंवा जिथे कुठे जे काही वाचायला मिळेल, यू ट्यूबवर पाहायला मिळेल, त्याचा प्रयोग महिला स्वत:च्या चेहऱ्यावर करायला लागतात.
काही वेळेस त्याचा उपयोग होतोही, पण खरं तर असं करणं धोक्याचं ठरू शकतं. तो प्रयोग तुमच्या चेहºयाला सूट नाही झाला, तर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी बिघडू शकतं. त्यातही या प्रयोगांमध्ये जर केमिकल्सचा, बाजारातल्या वेगवेगळ्या क्रिम्सचा समावेश असेल तर चेहऱ्याची पार वाट लागू शकते.
पण या साºयांत एक उत्तम घरगुती उपाय आहे, तो म्हणजे जांभळाचा. जांभळाच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवू शकतातच, पण तुमच्या चेहऱ्याव्ररील सुरकुत्याही गायब करण्याची शक्ती या जांभळामध्ये आहे.


अशी काय जादू आहे जांभळामध्ये?..
जांभळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अ‍ँटीआॅक्सिडंट्स असतात. जांभळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्कीनसाठी; त्यातही चेहºयाच्या स्कीनसाठी जांभळांचा खूप चांगला उपयोग होतो.
जांभळासारख्या छोट्याशा फळाचा आपल्याला काय उपयोग होत असेल, असं अनेकांना वाटू शकेल, पण आपल्या आरोग्यावर तर जांभळांचा सकारात्मक परिणाम होतोच, शिवाय जांभळं तुमच्या चेहºयावरील सुरकुत्याही घालवू शकतात.
काय कराल?
१- अगदी सोप्पं आहे.. काही जांभळं घ्या. त्यांचा किस करुन एकजीव अशी एक पेस्ट तयार करा.
२- ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारणपणे १५ मिनिटे लावून ठेवा.
३- ही पेस्ट सुकल्यावर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका.
४- काही दिवस सातत्यानं हा प्रयोग करून बघा.
५- तुमच्या लक्षात येईल जांभळांनी आपल्या चेहऱ्याचं फक्त सौंदर्यच खुलवलेलं नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही त्यांनी घालवलेल्य आहेत.
करून बघा हा प्रयोग, आणि त्याचा परिणाम दिसलाच, तर इतरांनाही सांगा..

Web Title: wrinkles on the face at very young age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.