शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

आग लागलीच तर काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 17:20 IST

गर्दीच्या ठिकाणीच कशाला दुर्देवानं आपल्या घरी आग लागली तर काय कराल? -पळू नका, डोकं वापरा.

ठळक मुद्देनागरी प्रशिक्षणाचा अभाव असलेल्या देशात निदान कॉमन सेन्स तरी शिकून घ्यायलाच हवा.

मुंबईत कमला मिल आग प्रकरण ताजे असतानाच मुंबईत एका रहिवाशी इमारतीत आग लागून एक कुटुंब होरपळून दगावले. आग लागली की भीती वाटतेच, माणसं सैरावैरा पळतात. त्यात आपल्याकडे परदेशासारखं आगीच्या संदर्भातलं नागरी प्रशिक्षण नसतं. तसं मॉक ड्रिल केले जात नाहीत. मुलांना आपण साध्या नागरी गोष्टी शिकवत नाहीत, कारण त्या मोठ्यांनाच येत नाही. मात्र सध्याच्या काळात काही गोष्टी आपल्याला किमान माहिती असणं आवश्यक आहे. अनेकदा आगीत भाजून दगावलेल्यांपेक्षा धुरात गुदमरुन गेलेल्यांची संख्या जास्त असते, असं आकडेवारी सांगते. असे प्रसंग कुणाच्याही वाटय़ाला येऊ नयेत. अगिAशामक दलाला फोन करण्याबरोबरच काही खबरदारीचे उपाय आपण शिकून घेतले पाहिजेत.

1)  थोडं स्पार्किग, थोडा शॉक, दुर्लक्ष करताय?घरात वीजेच्या बटणात कधी स्पार्किग होतं. कुठं करंट लागतो. आवाज येतात. एक बटण ऑन केलं तर भलतं बंद होतं. असं काही घरात घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एसी, मिक्सर, गिझर यासारख्या उपकरणांची काळजी घ्या. बिघाड झाला असेल तर वापरू नका.

2) छोटे मोठे शॉकघरात अनेकदा छोटे मोठे शॉक लागतात. त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण तसं करू नये, हे दुर्घटनेला आमंत्रण ठरू शकतं.

3) आग लागलीच तरबाहेर पडा. पण शांतपणे. चेंगराचेंगरी, आरडाओरडा न करता. त्या गर्दीतही पाण्यानं ओला रुमाल तोंडाभोवती लावा. जर कुठं अडकलात तर पडदे, चादरी, टॉवेल, कपडे जे मिळेल ते ओले करुन दारांच्या फटी, उंबरठे, खिडक्यांना लावा. त्यानं धूर शोषला जाऊन, तीव्रता कमी होवू शकते.

4) मॉलमध्ये जाताय.नेहमीचा मॉल असला नसला तरी एक्झिट कुठून आहे हे पाहून ठेवा. नकाशे वाचायला शिका.

5) फोटोशूटची हौस टाळाआग लागलेली असताना काहीजणांना शुटिंगचा मोह होतो. तो टाळा. जीव प्यारा, शूट नव्हे.