- मयूर पठाडेपाठीच्या मणक्याच्या आजारानं किती जण अंथरुणाला खिळून पडले असतील? किती जणांचं भविष्य त्यामुळे अंधारात खितपत पडलं असेल? किती जणांना त्यामुळे पुढचं सारं आयुष्य व्हिलचेअरवरच काढावं लागत असेल?..भारतात आणि जगातही अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: अपघातामुळे पाठीच्या मणक्याला दुखापत झाली की पक्षाघातामुळे अनेकांना मग चालणं, फिरणं, हालचाली करणं अशक्य होतं.. आणि आयुष्यभराचं अपंगत्व त्यांच्या नशिबी येतं..अनेक प्रसिद्ध लोकांनाही याचा सामना करावा लागला आहे. रुपेरी पडद्यावर ‘सुपरमॅन’ साकारणारा प्रसिद्ध अभिनेता ख्रिस्तोफर रिव्ह या अभिनेत्यालादेखील मणक्यांच्या दुखापतीमुळे तब्बल नऊ वर्षे व्हिलचेअरला खिळून राहावं लागलं होतं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं होतं. एका घोडेशर्यतीत भाग घेतल्यानंतर घोड्यावरुन पडल्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे पुढचं सारं आयुष्य त्याला व्हिलचेअरवरच काढावं लागलं होतं. एक पोर्टेबल व्हेंटिलेटरही त्याला बसवावा लागला होता.भारतात तर अपघातांची संख्या खूपच मोठी आहे आणि या अपघातांमुळे पाठीच्या मणक्यांना गंभीर मार बसून अंथरुणाला खिळून बसलेल्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. पाठीचा मणका, एकदा का खराब झाला, की त्यावर दुसरा उपाय नाही, पण या साºया लोकांसाठी खुशखबर आहे.शास्त्रज्ञ बºयाच वर्षांपासून यावर संशोधन करीत आहेत आणि त्यावर मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि या संशोधनाला मदत केली आहे तीदेखील झेब्राफिश या माशाने!
मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा ताठ उभे राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:43 IST
गोड्या पाण्यातील झेब्राफिश मासा करणार मदत!
मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा ताठ उभे राहणार!
ठळक मुद्देझेब्राफिश माशात आहे मणक्यांची दुखापत बरी करण्याची शक्तीमज्जातंतू पुन्हा होतात पुनरुज्जिवितअपघाताने मणक्याची दुखापत झालेल्यांना होऊ शकते मोठी मदतनव्याने आयुष्याची होऊ शकते सुरुवात