शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

तुमच्या झोपेचा तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रोलशी असतो जवळचा संबंध! जाणून घ्या नेमका कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:58 IST

तुमची झोप तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित किंवा अनियंत्रित करू शकते. बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की सर्वसाधारणपणे प्रौढांनी दररोज 7 ते 9 तासांची झोप घेण्याची आवश्यकता असते. हे प्रमाण तुमच्या वयानुसार वाढू किंवा कमी होऊ शकते.

जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर रात्री उशिरापर्यंत चित्रपट किंवा एपिसोड पाहणे आवडत असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक सवय असू शकते. चांगल्या आरोग्यासाठी रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास अनेक घातक आजार होऊ शकतात. यापैकी एक आजार म्हणजे उच्च कोलेस्टेरॉलची समस्या. यामुळे हृदय, किडनी, मेंदूशी संबंधित गंभीर आजारांना तुम्ही सहज बळी पडू शकता. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, तुमची झोप तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित किंवा अनियंत्रित करू शकते. बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की सर्वसाधारणपणे प्रौढांनी दररोज 7 ते 9 तासांची झोप घेण्याची आवश्यकता असते. हे प्रमाण तुमच्या वयानुसार वाढू किंवा कमी होऊ शकते.

अशा प्रकारे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतेअनेक संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही आवश्यक तितक्या प्रमाणात झोपला नाहीत तर काही दिवसातच तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. एवढेच नाही तर तुमची झोप रात्री कमकुवत राहिली आणि वारंवार तुटत असेल, तर तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वेगाने वाढू शकते. संशोधक अजूनही या विषयावर संशोधन करत असले तरी झोपेचा कोलेस्टेरॉलवर कसा आणि का परिणाम होतो.

एचडीएल होते कमीसंशोधनात असेही आढळून आले की जे लोक रात्री नीट झोपत नाहीत किंवा सातत्याने कमी झोपतात, त्यांच्या शरीरात एचडीएलचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. मात्र जे लोक खूप कमी झोपले किंवा खूप झोपले, त्यांच्या एचडीएलचे प्रमाणही खूप कमी असल्याचे आढळून आले.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ रक्तामध्ये आढळतो, जो पेशींना निरोगी ठेवण्यास आणि नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतो. परंतु जेव्हा ते आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते तेव्हा ते हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजाराचे कारण बनते.

कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते?ट्रान्स फॅटचे सेवन, सॅच्युरेटेड फॅट, फायबर नसलेले अन्न, व्यायाम किंवा वर्कआउट न करणे, एकाच ठिकाणी तासनतास काम करणे, धूम्रपान, मद्यपान इत्यादीमुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते.

टॅग्स :Healthआरोग्य