शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काळजीचं कारण... तरुणांच्या मेंदूचा आकार कमी होतोय, विस्मृतीचा धोका वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:13 IST

मानसिक तणावाचा तरुणांवर गंभीर परिणाम

मुंबई: वाढत्या मानसिक तणावाचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. तरुणांवर तर याचा अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानसिक तणावामुळे स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मेंदूतील भाग आकुंचन पावत असल्याची धक्कादायक माहिती संधोधनातून पुढे आलीय. या समस्येचा सर्वाधिक सामना तरुणांना करावा लागतोय. यामुळे तरुणांमध्ये विस्मृतीचा धोका वाढतोय. मानसिक ताण-तणावाचे मेंदू आणि स्मरणशक्तीवर होणारे परिणाम यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संशोधन केलं. यामध्ये 67 रुग्णांचा सहभाग होता. यातील नेमके कितीजण तणावाखाली आहेत?, तणावाचा शरीरावर काय परिणाम होतो?, यासाठी दीड वर्ष संधोशन करण्यात आलं. यामधून समोर आलेले निष्कर्ष अतिशय चिंताजनक आहेत. 67 पैकी 30 टक्के रुग्ण तणावाखाली असल्याचं यातून समोर आलं. स्मरणशक्तीशी निगडित असणाऱ्या 'हिपोकॅम्पस'चा आकार कमी होत असल्याची चिंताजनक माहितीदेखील यातून पुढे आली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विकास धिकव यांनी संशोधनाच्या निष्कर्षांबद्दल दिलेली माहिती चिंताजनक आहे. 'तणावाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्व रुग्णांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला. यानंतर त्यांच्या मेंदूतील हिपोकॅम्पसच्या आकाराचं मोजमाप करण्यात आलं. जे फार तणावग्रस्त नव्हते, त्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार सर्वसाधारण होता. मात्र जास्त  तणावाखाली असलेल्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार लहान झाला होता. त्यामुळेच सध्या विस्मरणाचा आजार वाढतोय. तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असेन हे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे,' असं धिकव यांनी सांगितलं.  

टॅग्स :Healthआरोग्य