शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तरुण राहायचं की वृद्ध, हे तुमच्याच हातात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:48 IST

जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते.

आपण म्हातारे होतो म्हणजे आपल्या अनेक क्षमता कमी होत जातात. वय जसजसं वाढत जातं, तसतसं आपल्या क्षमतांमध्ये घट होत जाते. अर्थात याच्या उलट लहानपण आणि तरुणपण. या काळात आपल्या क्षमता वाढत असतात आणि निरंतर त्यात वाढही होत असते. तुमचा आहार, दिनचर्या आणि तुमची आरोग्यशैली, व्यायाम उत्तम असेल, तर या क्षमतेत आणखी वाढ होते; 

 

पण जैवशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर मध्यम वयानंतर सर्वसाधारणपणे आपल्या कार्यक्षमता घटत जातात. मॉलिक्युलर आणि सेल्युलर डॅमेज यांची प्रक्रिया निरंतर सुरू असते. व्यायाम, आनंदी राहणं आणि आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या आधारावर आपल्या शरीराचा जो ऱ्हास होत असतो, तो आपण कमी करू शकतो; पणहा ऱ्हास सुरूच असतो. आपली शारीरिक क्षमता कमी होत असते, मेंदूची क्षमता कमी होत असते, आजारांचा आणि आजारांना बळी पडण्याचा धोका सातत्यानं वाढत असतो आणि आपल्या महत्त्वाच्या क्षमतांचा संक्षेप झाला की कालांतरानं आपला मृत्यू होतो; पण प्रत्येक वेळी हे बदल एकरेषीय आणि सातत्यानं होत असतात असं नाही. 

उदाहरणार्थ, समजा दोन सत्तर वर्षांचे वृद्ध घेतले तर त्या दोघांचीही शारीरिक आणि मानसिक क्षमता एकच असेल असं नाही. एखादा वृद्ध या वयातही एनर्जेटिक, उत्तम आरोग्य आणि तब्येत असलेला, उत्साही, कार्यतत्पर आणि वेगवेगळ्या आव्हानांना सतत सामोरा जाणारा असू शकतो. त्याचवेळी दुसरा वृद्ध मात्र अतिशय गर्भगळीत, आजारी, अनुत्साही, निराश, अगदी सहजपणे उठू-बसू न शकणारा तसंच इतरांच्या मदतीशिवाय काहीही करू न शकणारा असू शकतो. आपल्या आयुष्यात होणारे बदल, निवृत्त होणं, आपलं घर बदलणं, दुसऱ्या शहरात स्थलांतर करणं, ज्यांच्याबरोबर आपण उठलो-बसलो-खेळलो-वाढलो, त्या सोबत्यांचा मृत्यू होणं, आपला जीवनसाथीच आपल्याला सोडून जाणं... यासारख्या गोष्टीही तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात आणि त्यानुसारही वृद्धापकाळातलं आपलं वृद्धत्व आणि ‘तारुण्य’ अवलंबून असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरच तुमचं आनंदी किंवा दु:खी वार्धक्य अवलंबून असतं. त्यामुळे आनंदी आणि ॲक्टिव्ह वृद्धत्वाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तरुण राहायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद द्यायला आपण शिकलं पाहिजे.