शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिफ्टमध्ये काम? प्रजनन क्षमतेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 05:37 IST

संशाेधनातील निष्कर्ष; अनियमित वेळांचे महिलांवर दुष्परिणाम, विशिष्ट हार्माेन्स घटतात

वॉशिंग्टन : नोकरीच्या अनियमित वेळांमुळे अनेकांना आरोग्याविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नव्या संशोधनानुसार कामाच्या अनियमित वेळांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष २५ व्या युरोपीयन एंडोक्राइनोलॉजी कांग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधात मांडण्यात आला. मानवी शरीर हे सामान्यपणे २४ तासांच्या दिनक्रमानुसार कार्यरत असते. प्रकाशातील चढ-उतारावरून मानवी शरीर काम सुरू असते. त्यावरून झोपण्या-उठण्याच्या वेळा, हार्मोन्सचे स्रवण, पचनक्रिया, आदी प्रक्रिया सुरू असतात. 

उंदरांवर केली चाचणीn इन्स्टिट्यूट ऑफ सेल्युलर आणि इंटिग्रेटिव्ह न्यूरोसायन्स आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठाने याचा अभ्यास करण्यासाठी उंदरांच्या दैनंदिन आयुष्यात फेरबदल करण्यात आला. n चार आठवडे त्यांचे कालचक्र बदलण्यासाठी त्यांना रात्रीच्या वेळी प्रकाशात, तर दिवसा अंधारात ठेवण्यात आले. उंदरातील ल्युटेलायझिंग हार्मोन्स कमी झाल्याचे तपासणीत आढळले. n या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे उंदरातील प्रजननक्षमता कमी झाल्याचे आढळले. त्यावरून महिलांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्नआता मानवी पुनरुत्पादन प्रणालीत बदल घडवून आणणारी अचूक यंत्रणा समजून घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य संशोधक मरीन सिमोनॉक्स यांनी सांगितले.

चार आठवड्यांपर्यंत कामाच्या अनियमित वेळांमुळे मानवी जैविक घड्याळातून ल्युटेनायझिंग हार्मोन्स निर्माण करणाऱ्या किस्पेटिन न्यूरॉन्सवर परिणाम होतो. त्यामुळे थेट प्रजनन क्षमता कमकुवत होत असल्याचे दिसून आले.- मरीन सिमोनॉक्स, मुख्य संशोधक

मानवी मेंदूच्या मध्यवर्ती भागातील हायपोथॅलामसमध्ये एकप्रकारे जैविक घड्याळ असते.कामाच्या अनियमित वेळांमुळे तसेच जैविक घड्याळातील अनियमिततेमुळे ल्युटेलायझिंग हार्मोन्स कमी झाल्याचे आढळले.