(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)
सिजोफ्रेनिया एक मानसिक आजार आहे. WHO नुसार, जगभरातील १ टक्के लोकांमध्ये अशाप्रकारचा आजारा पाहिला जातो. हा वेगाने वाढणारा एक मानसिक आजार आहे. या आजाराने पीडित लोक स्वत: समाज आणि परिवारापासून दूर ठेवतात. ते एकटे राहणं अधिक पसंत करतात. अशात ही समस्या अधिक घातक होऊ शकते. पण यावर उपचार केले जाऊ शकतात, पण या आजारापासून बचाव करण्यासाठी याची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊ या आजाराची लक्षणे....
सिजोफ्रेनियासारखा मानसिक विकार उत्पन्न झाल्यावर व्यक्ती फार जास्त घाबरलेला असतो. आपली दैनंदिन कामे योग्यपप्रकारे करू शकत नाही. तसेच जगण्याचा आनंदही या आजाराने पीडित लोक घेऊ शकत नाहीत.
भ्रम
हा आजार झाल्यावर व्यक्तीच्या मेंदू एका भ्रमात राहतो. ते एका काल्पनिक दुनियेत राहू लागतात. ज्यात त्यांना वेगवेगळे चित्र दिसू लागतात. तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आवाजे ऐकू येऊ लागतात.
दुसऱ्यांवर संशय येणे
सिजोफ्रेनियाने पीडित व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीवर फार जास्त संशय घेऊ लागते. त्यांना हे वाटतं की, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विरोधात काहीतरी कट रचत आहेत. हे लोक सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नाहीत.
नेहमी कन्फ्यूज राहणे
या प्रकारच्या मानसिक विकारादरम्यान पीडित नेहमी कन्फ्यूज असतात की, त्यांना काय बोलायचं आहे. ते जेव्हा समोरच्या एखाद्या व्यक्तीबाबत बोलत असतात, तेव्हा काय उत्तर द्यावं, याबाबत फार जास्त विचार करताना दिसतात.
लक्ष केंद्रीत करण्यात कमतरता
या मानसिक आजारादरम्यान व्यक्तीचं कोणत्याही एका कामात लक्ष लागत नाही. मग ते टीव्ही बघत असो वा आणखी काही. ते एका जागेवर फार जास्त वेळ टिकत नाहीत. ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही ते एकाग्रतेने वेळ घालवू शकत नाहीत.
विचार होतात प्रभावित
जे लोक याप्रकारच्या मानसिक विकाराने पीडित असतात, त्यांना कोणत्याही विषयावर विचार करण्यात फार अडचण येते. ते कोणत्याही गोष्टीवर त्यांचं मत व्यक्त करू शकत नाहीत. ते काही विचार करतही असतील, तरी त्यांना काही तर्क नसतो. अशावेळी त्या व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त होत नाहीत आणि ते भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
कुणाला होतो हा मानसिक आजार
या प्रकारचा मानसिक विकार स्त्री आणि पुरूष दोघांमध्येही समान रूपात बघायला मिळतो. खास बाब ही आहे की, पुरूषांमध्ये याप्रकारचा विकार लवकर होतो आणि महिलांमध्ये हा आजार वयानुसार जास्त वेळ घेतो. हा विकार १६ ते ३० वयोगटातील लोकांमध्ये अधिक बघायला मिळतो. लहान मुलांमध्ये आणि ४५ वयानंतर हा आजार कमी बघायला मिळतो.