शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मानसिक आरोग्य दिन: ‘आत्महत्येचा विचार’ ही सायकॅट्रिक इमर्जन्सी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 03:08 IST

दोलायमान स्थिती असणाऱ्यांना धोका अधिक

- शीतलकुमार कांबळे सोलापूर : छातीत दुखायला लागले की कोणताही व्यक्ती हृदयविकाराच्या काळजीने त्वरित उपचाराचा प्रयत्न करतो. हृदयविकार ही जशी मेडिकल इमर्जन्सी समजण्यात येते, तशाच प्रकारे आत्महत्येचा विचार आलेल्या व्यक्तीवर 'सायकॅट्रिक इमर्जन्सी' मध्ये त्वरित उपचार करण्याची खरी गरज असते.हृदयविकाराच्या धक्क्याने आपला जीव जाऊ शकतो याची सर्वांनाच कल्पना असते. त्यामुळे छातीत दुखायला लागले तर रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक रुग्णाला उपचासाठी त्वरित घेऊन जातात. डॉक्टर तपासणी करुन पुढे काय करायचे हे सांगतात. त्याचप्रमाणे मनोविकाराचे देखील आहे. मात्र, पूर्वापार समजामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. हा आजार आहे, त्याला उपचाराची गरज असल्याचे अजूनही अनेकांना वाटत नाही.उदासीनता, नैराश्य, कधी एकदम उत्साह तर कधी उदासीनता, व्यक्तिमत्त्वातील अस्वस्थता, व्यसनाधीनता अशा मनाच्या दोलायमान स्थितीचे प्रकार मेंदूच्या विकारातून पाहावयास मिळतात. भावनिक आंदोलनातून मग मेंदूचा तोल जातो व अघटित घटना घडतात. मानसिक उपचार वेळीच मिळाल्यास त्या टाळता येतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.कोरोनामुळे तणावात वाढ...कोरोनामुळे अनेक बेकार झाले, आर्थिक संकट आले. जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जाता न आल्याने अनेकांना वाईट वाटले. घराबाहेर पडलो तर आपणाला काय भीती, बैचेनी, चिंता, एकटेपणा यात वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मानसिक आजाराबाबत अनेकामध्ये गैरसमज आहेत, ते आधी दूर व्हायला हवेत. आत्महत्येचा विचार मनात आल्यास ‘सायकॅट्रिक इमर्जन्सी’ समजून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. यामुळे एखाद्या व्यक्तीची आत्महत्या टाळता येणे शक्य होते. मानसिक आजाराबाबत आपण सर्वांनी बोलते होण्याची गरज आहे. ज्यायोगे मनुष्याच्या मानसिकतेची जाणीव होऊ शकते आणि त्यावर तातडीने उपचार होऊ शकतात. - डॉ. हर्षल तडसरे, मानसोपचार तज्ज्ञ, सोलापूर

टॅग्स :Suicideआत्महत्या