शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मानसिक आरोग्य दिन : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे राखाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 08:47 IST

शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात.

मुंबई - शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तत्व जगातील सर्वच समाजांमध्ये व सर्व स्तरांत रुजण्याची आवश्यकता आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून समजला जातो. यंदा कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य अशी संकल्पना घेऊन या दिवशी विविध कार्यक्रमांचे आणि व्याख्यानांचे आयोजन जगभरात केले जात आहे. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशन या दिनाचे आयोजन आणि प्रत्येक वर्षाच्या संकल्पनेची निवड करत असते.कामाच्या ठिकाणी असणारे मानसिक आरोग्य व्यक्तींमधील परस्पर संबंध आणि कामाचा ताण यावर अवलंबून असते. यातील प्रत्येक बाबीचा आपल्या कामाच्या जागी वर्तनावर व कामावर परिणाम होत असतो. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशनने यंदा ही संकल्पना निवडण्यामागे हेच कारण आहे. या संकल्पनेद्वारे कामाच्या ठिकाणी येणारे तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न व प्रत्येक कर्मचा-यानं आपल्या प्रश्नांबाबत खुलेपणाने इतरांशी बोलणे अपेक्षित आहे. फेडरेशनच्या मते 10 कर्मचा-यांपैकी 6 कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीची माहिती इतरांपासून लपवत राहतात. सिल्व्हर रिबन या सिंगापूरमधील एनजीओच्या निरिक्षणांनुसार, कार्यालयातील 23.4 टक्के कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीबद्दल कधीही तोंड उघडत नाहीत कारण त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटत असते तर माझी स्थिती इतरांना समजणारच नाही असा ग्रह 12.8 टक्के लोक करुन घेतात आणि या कारणांमुळे ते कधीच आपल्या प्रश्नांबाबत, भीतीबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत बोलत नाहीत.

मेंटल हेल्थ फाऊंडेशन या संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 65 टक्के लोक कामाच्या ठिकाणी घाबरलेले असतात, आपल्या वरिष्ठांशी मानसिक आरोग्याबाबत बोलायला त्यांना भीती वाटत असते. तसेच एक तृतियांश लोकांना मानसिक प्रश्न त्रास देत असतात आणि त्याबाबत ते कधीही जवळच्या व्यक्तीशी किंवा आप्तेष्टांशी बोलत नाहीत असेही या संस्थेच्या निरीक्षणातून दिसून आले आहे. बहुतांश लोकांनी आपण मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला कामावर ठेवणे पसंत करणार नाही अशी माहिती निरिक्षणांत नोंदवली आहे. यामुळेच कामाच्या ठिकाणी खुलेपणा असणे, मानसिक प्रश्न किंवा काळजी या मुद्द्यांवर वरिष्ठांशी बोलणे, कार्यालय व कर्मचारी यांच्यामध्ये संवादाचा वेगळा दुवा स्थापन करणे असे उपाय कंपन्यांनी करावेत, असे उपाय तज्ज्ञ सुचवतात.

टॅग्स :Healthआरोग्य