शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

World Heart Day : कोरोना काळात हृदय सांभाळा, कोविडला पळवा! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 08:47 IST

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि गतिहीन जीवनशैली यांच्यामुळे या आजाराची जोखीम वाढते.

डॉ. विद्याधर एस. लाडएम सीएच, डीएनबी, एफआरसीएसकन्सल्टंट-अ‍ॅडल्ट कार्डियाक सर्जरी व हार्ट ट्रान्सप्लान्टेशनकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई

‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे जगभरात 3.14 कोटी लोक बाधित झाले आहेत आणि 9.67 लाख जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील बाधित नागरिकांची संख्या 56 लाखांवर गेली असून 91 हजारापेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. रुग्णांची संख्या जशी वाढत चालली आहे, तशी विविध अभ्यासांमधून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. यामधूनच कोरोना व्हायरस आणि हृदयरोग यांचा जवळचा संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. आपण ‘जागतिक हृदयदिन’ साजरा करीत असताना, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असलेल्या रुग्णांवर ‘कोविड-19’चे काय परिणाम आहेत, ते पाहू या.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि गतिहीन जीवनशैली यांच्यामुळे या आजाराची जोखीम वाढते. या आजाराचे लवकर निदान होण्याकरीता नियमित कालावधीत आरोग्य तपासणी करून हृदयविकाराची वाढ रोखणे व वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या ‘कोविड-19’च्या प्रादुर्भावाच्या काळात हे पैलू पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.

वृद्ध रूग्ण आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा व हृदयविकार हे आजार असलेल्यांना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांची प्रकृती गंभीर होण्याचा धोका जास्त असतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार व त्यांची गुंतागुंत असणाऱ्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त असते. याचे कारण, आपल्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडवून आणण्याची कोरोना व्हायरसमध्ये क्षमता असते.

‘कोविड-19’चा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या यंत्रणेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. यामुळे हृदयाचे थेट नुकसान होऊ शकते आणि फुफ्फुसात तीव्र संसर्ग झाल्याने त्यामुळेही हृदयावर मोठा ताण येतो.  हृदयाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांमधे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती वाढते आणि यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. हृदयाच्या ठोक्यांची लय अनियमित झाल्यामुळे ‘कोविड-19’च्या आजाराची गुंतागुंत वाढून ‘कोविड’मुळेच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

लोकांमध्ये ‘कोविड-19’ची भीती इतकी बसली आहे, की ते या कठीण प्रसंगी वैद्यकीय मदत वेळेवर घेण्यातही टाळाटाळ करू लागले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांचे गंभीर रुग्ण गुंतागुंत झाल्यावरदेखील उपचार घेण्यात विलंब लावत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांमध्ये ‘कोविड’चे व इतर रुग्ण यांना स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था आहे व त्यांच्यावर वेगवेगळे डॉक्टर उपचार करीत आहेत, स्वच्छतेचे व शारिरीक अंतर पाळण्याचे नियम तेथे काटेकोरपणे पाळले जात आहेत, हे समजावून दिले, तर या रुग्णांची भिती घालवता येऊ शकेल.

“हृदयविकाराचा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा”, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे.  म्हणूनच आपल्या हृदयाचे ऐकू या आणि ते निरोगी ठेवण्यासाठी काय लागते, हे समजून घेऊ या. गरज पडल्यास वेळेवर उपचार करून आपल्या हृदयाचे आणि कोरोना व्हायरसपासून असुरक्षित असणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व मार्ग अवलंबू या. उपचार करून घेण्यात पौंड खर्च करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर औंस खर्च करणे कधीही चांगले! चला, सर्वांनी मास्क घालणे, हात निर्जंतूक करणे, शारिरीक अंतर राखणे हे नियम पाळू या आणि कोरोना व्हायरसला दूर ठेवू या.

'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत

सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealthy Diet Planपौष्टिक आहारcorona virusकोरोना वायरस बातम्या