शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Womens Health: गर्भपात केलेल्या, मृत बाळाला जन्म दिलेल्या महिलांना स्ट्रोकचा धोका, क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 06:37 IST

Womens Health: ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्यांनी मृत बालकाला जन्म दिला आहे, अशा महिलांना पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा मोठा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली आहे. 

क्वीन्सलँड :  ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्यांनी मृत बालकाला जन्म दिला आहे, अशा महिलांना पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा मोठा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने रक्तप्रवाह मेंदूपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पक्षाघात होण्याचा संभव असतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलने या संशोधनावर आधारित एक लेख प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. प्रसूतीनंतर तब्येतीला काही गंभीर धोके संभवतात. त्यापासून अनेक महिला अनभिज्ञ असतात. गर्भपात, मृत बाळाला जन्म देणे अशा अवस्थांमध्ये पक्षाघात होण्याची जोखीम वाढते. शरीराला सूज येणे, रक्तप्रवाहासाठी मदत करणाऱ्या एन्डोथिलियल पेशींच्या कामात अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या संशोधनामध्ये ६ लाख १८ हजार ८५१ महिलांना सहभागी करून घेण्यात आले. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, नेदरलँड, स्वीडन, ब्रिटन, अमेरिका आदी देशांतील महिलांचा त्यात समावेश होता. या महिला ३२ ते ७३ वर्षे वयोगटातील होत्या. या संशोधनात सहभागी झालेल्या महिलांपैकी ९२६५ महिलांना एकदा पक्षाघाताचा सामना करावा लागला होता. (वृत्तसंस्था)

हृदयविकाराचा झटका येण्याचा संभवक्वीन्सलँड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात सहभागी झालेल्या ९१,५६९ महिलांचा गर्भपात झालेला होता. तर २४,८७३ महिलांनी मृत बाळाला जन्म दिला होता. तीन किंवा अधिक वेळा गर्भपात करणाऱ्या महिलांना कोणतेही नुकसान न करणारा पक्षाघात होण्याचा धोका ३५ टक्के अधिक असतो. अशा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचाही संभव असतो. 

टॅग्स :womens healthस्त्रियांचे आरोग्यHealthआरोग्य