शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१०८च्या तत्परतेने वाचविला महिलेचा जीव

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

बारामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला.

बारामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला.
बारामती शहरातील रमेश कुंभार हे मंगळवारी आपल्या कुटुंबियांसह लातूरहून परतत होते. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा गणेश, महेश यांच्यासह त्यांची मोठी बहीण आशा कुंभार, सुरेखा चौगुले हे होते. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान कुर्डुवाडी येथे आशा यांना अचानक श्वास घेताना धाप लागू लागली. याच दरम्यान, टेंभुर्णी ते इंदापूर दरम्यान अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या वेळी सुरेखा चौगुले यांनी शासकीय रुग्णवाहिका सेवेसाठी १०८ क्रमांकाला संपर्क साधला. तात्काळ सोलापूरमधून शासकीय रुग्णवाहिका निघाली. ही रुग्णवाहिकादेखील वाहतुकीच्या कोंडीत अडकली. मात्र, या रुग्णवाहिकेतील कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून इंदापूरच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून १०८ क्रमांक सेवेअंतर्गत असणारी अन्य रुग्णवाहिका पाठवून दिली.
टेंभुर्णी आणि इंदापूर परिसरातील टोलनाक्याजवळ रुग्णवाहिका कुंभार कुटुंबीयांजवळ पोहोचली. तातडीने रुग्णवाहिकेतील डॉ. रवींद्र खटके यांनी अत्यवस्थ झालेल्या कुंभार यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णवाहिका तातडीने बारामती शहरातील गिरीराज रुग्णालयाच्या दिशेने आणण्यात आली. या तातडीच्या उपचारांमुळे आशा यांचे प्राण वाचू शकले.