शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यातील सूजेकडे दुर्लक्ष करणं महिलेला पडलं चांगलंच महागात; झाला गंभीर आजार अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:14 IST

महिलेच्या उजव्या डोळ्याला सूज आली होती. बर्‍याच लोकांप्रमाणे ती देखील ही एक सामान्य समस्या मानत होती. तापामुळे डोळे सुजले आहेत असं तिला वाटलं. मात्र, जेव्हा तिला खरं कारण समजलं तेव्हा मोठा धक्का बसला.

सुजलेले डोळे हे कोणत्यातरी गंभीर आजाराचे लक्षण असू शकतं असं कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे.  सियारन मॉर्गन नावाच्या महिलेच्या उजव्या डोळ्याला सूज आली होती. बर्‍याच लोकांप्रमाणे ती देखील ही एक सामान्य समस्या मानत होती. तापामुळे डोळे सुजले आहेत असं तिला वाटलं. मात्र, जेव्हा तिला खरं कारण समजलं तेव्हा मोठा धक्का बसला.

सियारनचा उजवा डोळा खूप मोठा झाला होता. त्यातून पाणी येत होतं. जेव्हा सियारान तिच्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी ही समस्या तापाचाच परिणाम असल्याचे सांगितले. सियारनच्या मनात अजूनही शंका होती. शंका दूर करण्यासाठी ती एका ऑप्टिशियला भेटली. ऑप्टिशियनने देखील ही एक सामान्य समस्या असल्याचं सांगितलं. पण तरीही सियारानचं समाधान झाले नाही. कारण तिचा डोळा खूप सुजला होता आणि हाडं दुखणे, केस गळणं, त्वचेला खाज येणं, लक्ष न लागणं, घाम येणं आणि चिंता यांसारखी विचित्र लक्षणंही एकाच वेळी दिसू लागली.

10 तास चाललं ऑपरेशन 

महिला पुन्हा डॉक्टरांना भेटली आणि तिने एमआरआय स्कॅन करून घेतले. एमआरआय स्कॅनचा निकाल समोर आला तेव्हा ती घाबरली. डॉक्टरांनी तिला सांगितले की टेनिस बॉलसारखा ट्यूमर हे तिच्या डोळ्याला सूज येण्यामागचं कारण आहे. ट्यूमरची बाब समोर आल्यानंतर सियारनचे ऑपरेशन 10 तास चालले. किंग्सब्रिज, डेव्हॉन येथील रहिवासी सियारन मॉर्गनने सांगितलं की, "मी डॉक्टरांना माझ्या प्रकृतीबद्दल सांगितलं. नंतर त्यांनी मला विचारले की माझ्या डोळ्याला काय झाले आहे. ट्यूमरबद्दल कळल्यावर मला खूप वाईट वाटलं आणि मी रडू लागले. मी माझ्या दोन्ही मुलांना हे कसं सांगू याबद्दल विचार करत होतो."

जीवघेणा होता ट्यूमर 

सियारनच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितले की ट्य़ूमर डोळ्याच्या आत होता आणि ऑप्टिक मज्जातंतूला स्पर्श करत नव्हता, म्हणूनच त्याची दृष्टी अजूनही चांगली आहे. ट्यूमर सियारनच्या डोक्याच्या वरच्या भागातून आणि डोळ्याच्या खाली होता, म्हणजे तो कवटीत पसरत होता. ट्यूमर इतका जोखमीची होता की डॉक्टरांनी कवटीचं थ्रीडी मॉडेल बनवलं, जेणेकरून कोणतीही जोखीम न घेता तो कसा काढता येईल हे समजू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य