शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

ट्रान्सप्लांट झाले नाही तर माझ्या मुलाकडे जगण्यासाठी काही दिवसच राहतील...! मदतीसाठी आईची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2023 18:22 IST

वृषांकने चौथीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि तो आजारी पडला. यानंतर आम्ही डॉक्टरांकडे बऱ्याच चकरा मारल्या. मात्र, डॉक्टरही त्याच्या आजाराचे कारण शोधू शकले नाहीत. आता त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

माझा 9 वर्षांचा मुलगा वृषांक गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून एका आजाराने त्रस्त आहे. याची सुरुवात पोटाची सूज आणि तीव्र वेदनांनी झाली. ऑक्टोबर महिन्यात त्याला विल्सनच्या आजाराचे निदान झाले. त्याला लवकरात लवकर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करणे आवश्यक आहे. ते शक्य झाले नाही, तर तो या स्थितीत जगू शकणार नाही.

मला वृषांक आणि हृदान नावाची दोन मुलं आहेत. माझे पती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि मी घरीच मुलांची काळजी घेते. वृषांकने चौथीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि तो आजारी पडला. यानंतर आम्ही डॉक्टरांकडे बऱ्याच चकरा मारल्या. मात्र, डॉक्टरही त्याच्या आजाराचे कारण शोधू शकले नाहीत. डॉक्टरांनी केवळ काही औषधी लिहून दिली आणि आम्ही हतबलपणे तो बरा होण्याची वाट पाहत होतो

यानंतर आम्ही वृषांकला एका स्थानिक रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्या पोटात पाणी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र तेथेही डॉक्टर केवळ औषधोपचाराच्या सहाय्यानेच उपचार करत होते. पण जेव्हा त्याचा त्रास आणखी वाढला तेव्हा आम्ही त्याला मुंबईतील एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयात तातडीने त्याच्या पोटातील पाणी काढण्यात आले आणि एन्डोस्कोपी करत वृषांकचे निदान करण्यात आले. यात, "त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करणे, हाच त्याचा जीव वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे," असे त्यांनी आम्हाला सांगितले. आता त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

माझे पती म्हणतात, "आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. गेल्या १० महिन्यांत आम्हाला जे काही शक्य होते ते सर्व आम्ही केलं. आम्ही सातत्याने डॉक्टरांची भेट घेतली, औषधोपचार आणि टेस्ट देखील केल्या."

रुग्णालयाच्या सुरुवातीच्या खर्चासाठी आम्ही आमचे दागिनेही विकले आहेत. उत्पन्नाच्या स्रोताशिवाय एवढी महागडे उपचार करणे माझ्या कुटुंबासाठी अशक्य आहे.

डॉक्टरांनी म्हटले आहे की, मी माझ्या यकृताचा एक तुकडा माझ्या मुलाला दान करू शकते. मात्र, यासाठीही पैसे लागणार आहेत. त्यामुळे मुबलक पैसे असल्याशिवाय आम्ही ही प्रक्रिया करू शकत नाही. मी आता माझ्या मुलाच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही.

कृपया माझ्या वृषांकला वाचवा, तो केवळ ९ वर्षांचा आहे! तो आणखी सहन करू शकत नाही...

या संदर्भातील तपशील, संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय टीमकडून पडताळण्यात आला आहे. उपचार अथवा संबंधित खर्चासंदर्भात कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण हवे असल्यास, मोहिम संयोजक अथवा वैद्यकीय टीमशी संपर्क साधावा.

Charity No: 81674085

टीप: या निधीत करण्यात येणारे डोनेशन 80G, 501(c) अंतर्गत करसवलतीसाठी पात्र नाही.

 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल