शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढल्याने, मुलांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:29 IST

गेल्या काही दिवसात राज्यात थंडीने सोबत काही आजारही आणले आहेत.

Health Tips : गेल्या काही दिवसात राज्यात थंडीने  सोबत काही आजारही आणले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा रुग्ण आढळत आहे. काहींचा विकार इतका बळावतो की त्यांना ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार होऊन  रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे या काळात लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.     

नागरिकांचे पावसाळा, उन्हाळा या मोसमात प्रचंड हाल हाेतात. त्यामुळे कधी ती एकदाची थंडी पडतेय याची वाट पाहत असतात. मात्र बालकांना  या थंडीच्या काळात विशेष करून श्वसनविकाराच्या व्याधीला सामोरे जावे लागते. काहींचा विकार इतका बळावतो की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

मुले चिडचिडी होतात :

 लहान मुलांचा हा त्रास काही दिवस राहिल्यास खोकून खोकून घसा लाल होतो. त्यामुळे या आजारावरील उपचाराकरिता डॉक्टरकडे जावे लागते. काही जणांना याचा त्रास अधिक जाणवून ताप येत असतो. 

  सुरुवातीच्या काळात वाटणारा खोकला आणि सर्दी ही सर्वसामान्य लक्षणे वाटत असली तरी त्याच्यावर वेळीच उपचार नाही केल्यास तो त्रास वाढण्याची शक्यता अधिक आहे.   या काळात मुले चिडचिडी होतात, खाण्यास टाळाटाळ करतात.   

थंड हवा टाळण्यासाठी लहान मुलांचे कान, छाती आणि तळव्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना शक्यतो गरम कपडे वापरण्यास सांगितले पाहिजे. तसेच त्यांना कोमट पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. त्यांना या काळात थंड पदार्थ देऊन नयेत. या थंडीमुळे त्यांना सर्दी-पडसे, खोकला असे आजार होतात. मात्र काही वेळेस हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते.  त्यामुळे त्यांना  त्यांना ब्रॉन्कायटिस, न्यूमोनियासारखे आजार होऊ शकतात. - डॉ. उपेंद्र किंजवडेकर, अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना

थंडी वाढल्याने, मुलांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; अशी घ्या काळजी - बातमीसाठी फिचर फोटो पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी