का वाढते महिलांचे वजन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:22 IST
वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
का वाढते महिलांचे वजन !
वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बऱ्याच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी खाण्याचे प्रमाण, वेळा व गुणवत्ता या तीनही गोष्टींची विशेष काळची घ्यायला हवी. जेवताना इच्छेला आवर घालून शरीराला आवश्यक असेल तेवढेच खावे. वजन वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच पुरेसा व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. वजन वाढण्याची कारणेहार्मोनल बदलमहिलांमध्ये हार्मोन्समध्ये बदल झाल्याने हायपोथायराडिज्म, पीसीओडी सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे वजन वेगाने वाढते. असे झाल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अवश्य असते. विशेषत: अशावेळी आहारातील प्रोटीनचे प्रमाण कमी करुन तळलेल्या गोष्टी अजिबात खाऊ नये.अपूर्ण झोप पुरेशी झोप न झाल्याने भूक लागण्याशी संबंधित हार्मोन्स लेप्टीन व घेरेलिन यांच्या कार्यावर विपरित परिणाम होऊन भूक अनियंत्रित होते व वजन वाढते. त्यामुळे पुरेशी शांत झोप घेणे आवश्यक आहे.साखरेचे जास्त प्रमाण ज्या पदार्थांमध्ये साखर, सुक्रोज, ग्लुकोज, मेल्टोज आदींचे प्रमाण अधिक आहे तसेच फळांचा रस जास्त घेत असाल तर वजन वाढण्यास मदत होते. म्हणून अशा पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवा. अन्यथा तुमचे वजन अधिक वाढेल. कॅलरीजवजन कमी करण्याच्या प्रयत्नात केवळ कॅलरीजकडे लक्ष देऊन डायटिंगवर असाल तर याचा फारसा फायदा होणार नाही. कॅलरीसोबतच शरीराला अन्य पोषक तत्वांची गरज भासते. त्यामुळे पूरक प्रमाणात फळे, भाज्या, कडधान्याचा आहारात समावेश असायला हवा. फास्ट फूडमुळे वजन वाढते. त्यामुळे घरी बनवलेले साधे जेवण केव्हाही चांगलेच असते.