शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

पुरुषांचा ‘सिक्स्थ सेन्स’ महिलांपेक्षा स्ट्राँग का?, चिंता आणि नैराश्याचा होतोय महिलांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 06:38 IST

Health News: दृष्टी, स्पर्श, चव, गंध आणि श्रवण यानंतर माणसातील ‘सिक्स्थ सेन्स’बाबत वेळोवेळी संशोधन झाले आहे. शरीराच्या अंतर्गत अवस्थेबद्दलच्या आपल्या आकलनाला ‘इंटरसेप्शन’ म्हणजेच ‘सिक्स्थ सेन्स’ असेही म्हटले जाते.

लंडन - दृष्टी, स्पर्श, चव, गंध आणि श्रवण यानंतर माणसातील ‘सिक्स्थ सेन्स’बाबत वेळोवेळी संशोधन झाले आहे. शरीराच्या अंतर्गत अवस्थेबद्दलच्या आपल्या आकलनाला ‘इंटरसेप्शन’ म्हणजेच ‘सिक्स्थ सेन्स’ असेही म्हटले जाते. महिलांचा ‘सिक्स्थ सेन्स’ पुरुषांच्या तुलनेत खूपच वेगळा असून, तो महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये किचिंत मजबूत असल्याचे ब्रिटनच्या लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले.

‘द कॉन्व्हर्सेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ‘सिक्स्थ सेन्स’ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या विषयावर मागे ९३ अभ्यास करण्यात आले होते. त्या अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण करणाऱ्या संशोधनात असे आढळून आले की महिलांना त्यांच्या हृदयाचे ठोके आणि फुप्फुसाचे सिग्नल पुरुषांपेक्षा कमी जाणवतात. 

या फरकामागे रक्तदाब किंवा वजन असे कोणतेही घटक नाहीत. याची मुख्य कारणे आनुवंशिकता, हार्मोन्स, व्यक्तिमत्त्व आणि तणाव असू शकतात. ‘सिक्स्थ सेन्स’वर परिणाम करणारे घटक योग्यरीत्या ओळखणे मानसिक आरोग्य विकारांवर प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

विचारही वेगळास्त्री-पुरुषांचा विचार करण्याचा आणि समजण्याचा स्तर वेगवेगळा असतो. हेदेखील त्यांच्या ‘सिक्स्थ सेन्स’मधील फरकाचे कारण असू शकते. ‘सिक्स्थ सेन्स’मुळे प्रत्येक व्यक्तीला भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव येतो. ‘सिक्स्थ सेन्स’बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

चिंता, नैराश्याचे प्रमाण जास्त असल्याने...nलंडन विद्यापीठातील मानसशास्त्राच्या व्याख्याता जेनिफर मर्फी म्हणाल्या की, महिलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या भावना, सामाजिक परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होतो. nपुरुषांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या ‘सिक्स्थ सेन्स’ क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हा फरक समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय