शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जास्त लोणचं खाणं पुरूषांसाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 12:18 IST

Pickle Side Effects : लोणचं तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

Pickle Side Effects : जेवणासोबत टेस्टसाठी भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीचं लोणचं खातात. लोणचं दिसलं किंवा नावही काढलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लोणचं तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

काही लोक लोणच्याचं इतकं जास्त सेवन करतात की, ते भाजी ऐवजी लोणच्या सोबतच चपाती खातात. बरेच लोक लोणच्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात. अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे.

जास्त लोणच्याने काय होतात समस्या?

गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका

काही रिसर्चमधून समोर आलंय की, जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो. सोबतच यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठीही हे फार धोकादायक ठरू शकतं. हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी लोणच्याचं जास्त सेवन करणं फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं.प्रिझरव्हेटिव्ह जास्त असतात

बाजारात जे लोणचं मिळतं त्या लोणच्यांमध्ये जास्त प्रिझरव्हेटिव्ह असतात आणि सोबतच या लोणच्यामध्ये जास्त असटामिप्रिड असतात, जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. असटामिप्रिक एक कार्बन आहे, जे तुमच्या सेक्शुअल लाइफमध्ये अनेक समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे या लोणच्याचं सेवन कमी प्रमाणात करावं.

कोलेस्ट्रॉल वाढतं

लोणच्याचं कमी प्रमाणात सेवन करावं. कारण जेव्हा लोणचं तयार केलं जातं तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकलं जातं आणि सोबतच मसाल्यांचा वापर केला जातो. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या वाढू शकतात.

लोणच्याने होणाऱ्या इतर समस्या

ब्लड प्रेशर वाढतं

एक्सपर्ट सांगतात की, हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी अजिबात लोणच्याचं सेवन करू नये कारण यात मिठाचं प्रमाण जास्त असतं. मिठाचं सेवन जास्त केल्याने हाय ब्लड प्रेशर वाढतं. ज्यानंतर तुम्हाला हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

वजन वाढण्याचा धोका

लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि फॅट असतात. त्यामुळे जास्त लोणचं खाल्ल्याने वजन वाढू शकतं. लठ्ठपणा वाढतो आणि मग हृदयरोगाचा धोका वाढतो.

किडनीवर पडतो वाईट प्रभाव

जास्त मीठ आणि मसाल्याचं सेवन केल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडन्यांचं काम हळू होतं. तुम्ही नेहमीच लोणचं जास्त खात असाल तर किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य