शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Health: व्यायाम केल्याने का येतोय हार्ट अ‍ॅटॅक? सायलेंट किलर बनतंय हे कारण, डॉक्टर म्हणतात.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:07 IST

Health News: गेल्या काही दिवसांपासून देशात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकेकाळी हार्ट अ‍ॅटॅक हा वृद्धांचा आजार मानला जात होता. मात्र आता तरुणांनाही हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकेकाळी हार्ट अ‍ॅटॅक हा वृद्धांचा आजार मानला जात होता. मात्र आता तरुणांनाही हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. त्यातही व्यायामशाळेत व्यायाम करताना हार्ट अ‍ॅटॅक येण्याची उदाहरणेही समोर येत आहेत. 

कमी वयात लोकांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यांचे प्रमाण वाढल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. तसेच अनेक जणांनी अशा बातम्या वाचल्यापासून जिममध्ये जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. जिममध्ये जाणाऱ्या लोकांना हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डियोवेस्कूलर संबंधित आजार का होत आहेत, हे जाणून घेण्यास तसेच या संबंधीचा धोका टाळण्यासाठी काय करता येईल, याबाबत जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले की, भारतामध्ये हार्ट अ‍ॅटॅकच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बहुतांश लोकांचे वय हे ३० ते ४० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या साथीनंतर लोकांमध्ये हार्टसंबंधी आजारांचा धोका अधिक वाढला आहे. कारण कोरोना विषाणूमुळे रक्त वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्यामुळे हार्टसंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे.

त्याशिवाय कोरोनानंतरची सुस्त जीवनशैली, चुकीचे खानपान आणि स्ट्रेस लेव्हल वाढल्याने हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढला आहे. वाढत्या स्ट्रेसमुळे लोक स्मोकिंग, ड्रिंकिंग करूलागले आहेत, ही बाब हार्ट संबंधीच्या आजारांच्या वाढीसाठी कारणीभूत आहे. तसेच जे कुणी रोज जिममध्ये जातात त्यांनीही आपण पूर्णपणे फिट आहोत, असे समजू नये. कारण त्यांचं शरीर वरून खूप फिट वाटत असलं तरी आतून ते खूप कमकुवत आणि आजारी असते. त्या कमकुवत शरीरावरत गरजेपेक्षा अधिक भार टाकला तर ते योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही.

शरीरावर गरजेपेक्षा अधिक भार टाकणे, श्वास फुलणे आण हृदयामध्ये ऑक्सिजनच्या पूर्ततेला प्रभावित करते. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक किंवा सडन कार्डिएक अरेस्टचा धोका वाढतो. आजकाल तरुण जीममध्ये फिटनेस किंवा अ‍ॅब्स बनवण्यासाठी जातात. मात्र सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवल्याने फिटनेस बनत नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

तसेच बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंटबाबतही डॉक्टरांनी इशारा दिला आहे. आजकाल तरुण कमी वयात सप्लिमेंटचा अधिक प्रयोग करतात. हे सप्लिमेंट प्रत्येक बॉडीच्या शरीरासाठी योग्य आहेत ही नाही, त्याचा प्रयोग कसा केला पाहिजे, याबाबत माहिती घेतली पाहिजे. सप्लिमेंट नकली असेल, अतिरिक्त सेवन केलं असेल, याबाबत माहिती असूनही कुणी सप्लिमेंटचा वापर करत असेल तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढेल आणि हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोकाही वाढू शकतो. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य