शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या दाताला कीड का लागते?, चॉकलेटमुळे विषाणू वाढीस लागतात, जंकफूडचाही होतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:32 IST

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी विचित्र असतात. तसेच त्याचा जंकफूड खाण्याकडे ओढा असतो. त्या जंकफूडचे कण अडकून राहिल्याने दात किडण्यास सुरुवात होते.

मुंबई : लहान मुलांमध्ये दात किडणे  ही एक सामान्य समस्या आहे. मुख्य म्हणजे चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाल्ल्याने ते अनेकवेळ दातांवर तसेच राहतात. त्यामुळे  त्या ठिकाणी विषाणू वाढीस लागतात आणि दात किडण्यास सुरुवात होते. जंकफूड मोठ्या प्रमाणात सध्या लहान मुले खातात. त्याचाही परिणाम लहान मुलांच्या दातांवर होत असतो. अनेक वेळा लहान मुले दात स्वच्छ (ब्रश) करण्यास टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या दातांच्या आरोग्यावर होतो. लहानपणीच दात किडल्यामुळे अनेकांचे दात काढावे लागत असल्याचे दंत चिकित्सक सांगतात. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना किमान सकाळ आणि संध्याकाळी ब्रश करतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

लहान मुले कायमच दात किडण्याची समस्या घेऊन आमच्याकडे येतात. आजही दातांच्या आरोग्याविषयी आपल्याकडे जनजागृती करण्याची गरज आहे. अनेक पालकांचे आपल्या पाल्याच्या दातांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, दात एवढे किडतात की ते काढण्यावाचून पर्याय राहत नाही. यामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. दात पडल्यामुळे ते हसत नाही. बाकीचे वर्गातील मुले त्यांना चिडवतात. या सगळ्या गोष्टी  घडू नये, असे पालकांना वाटत असेल तर त्यांनी वेळीच मुलांच्या दाताच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे आपले मूल दिवसातून दोनदा ब्रश करत आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. - डॉ. आकाश अकिनवार,  इम्प्लांटोलॉजिस्ट

कीड लागण्याची ही आहेत कारणे 

अन्नाचे कण अडकल्याने : लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी विचित्र असतात. तसेच त्याचा जंकफूड खाण्याकडे ओढा असतो. त्या जंकफूडचे कण अडकून राहिल्याने दात किडण्यास सुरुवात होते.

दुधाच्या  बाटलीमुळे   लहान मुले रात्रभर दुधाची बाटली तोंडात ठेवून अनेक वेळा झोपतात. त्याच्यामध्ये अनेक वेळा साखर असते. रात्रभर मुलाचे तोंड उघडे राहते.   दातांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. यामुळे विशेष करून पुढील भागातील वरचे दात किडतात. वैद्यकीय भाषेत याला  नर्सिंग बॉटल केरीज असेही म्हणतात.

काळजी काय घ्याल?   हल्ली लहान बाळांसाठीसुद्धा ब्रश बाजारात उपलब्ध आहेत. पालकांनी त्याच्या बोटात तो ब्रश धरून हळूवारपणे लहान मुलाचे दात स्वच्छ केले पाहिजेत.   लहान मुलांना दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना मुलांनी ब्रश केला आहे की नाही यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे.  मुले किती प्रमाणात चॉकलेट, जंकफूड खातात यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तसेच लहान मुलांना या गोष्टीचा अतिरेक केल्यावर काय परिणाम होतात हे सांगतिले पाहिजे. तसेच दाताच्या काही तक्रारी असल्यास त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स