शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीचा उपवास कुणी करावा? शास्त्र काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:04 IST

उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. 

- डॉ. नितीन पाटणकर; जीवनशैली आरोग्यतज्ज्ञ

पं तप्रधान नरेंद्र मोदी एका नवरात्री दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. ते नवरात्रीत कडक उपास करतात. फक्त पाणी आणि लिंबूपाणी, ते पण मर्यादित वेळा. त्या दौऱ्यात अनेक सभा, जागतिक नेत्यांसोबत भेटी आणि इतर कामांचा प्रचंड ताण असतानादेखील पंतप्रधानांनी आपला उपवास चालू ठेवला होता. ते बघून अनेकांनी नवरात्रीत उपवास सुरू केले. पंतप्रधानांचे उपवास माहीत नसतानादेखील भारतात अनेक लोक नवरात्रात उपवास करीतच होते. त्यांच्या उपवासाच्या बातमीनंतर हे एक फॅड बनले. 

इतर उपवासांप्रमाणे विशिष्ट गोष्टी खाऊन उपवास करणे हे सर्वात सोपे आहे. थोडा जास्त कठीण उपवास म्हणजे फक्त फळांवर राहणे. फक्त लिंबूपाणी किंवा फक्त पाणी पिऊन राहणे हा सर्वात कठीण उपवास. सर्वात कठीण उपवास कुणी करू नये?गरोदर स्त्रिया, स्तनपान चालू असेल तर, बारा वर्षांखालील मुलं, सत्तरीच्यावरील व्यक्ती, मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीचे आजार असलेल्या व्यक्ती, आजारी व्यक्ती, नुकत्याच आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, भरपूर व्यायाम करणाऱ्या किंवा कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, वरचेवर प्रवास करावा लागत असेल तर तसेच खाण्यासोबत ज्यांना औषधे घ्यायची असतात अशा व्यक्ती. 

दुर्गामातेबद्दल श्रद्धा आणि परंपरा यांच्या मिश्रणातून नवरात्रीत उपास केले जातात. कुणी ‘उपवास तब्येतीकरता चांगले’ म्हणून करतात. तब्येतीसाठी उपवास करायचे असतील तर दर आठवड्याला उपवास करणे जास्त चांगले. ती तयारी काही वर्ष केली तर मग सुरुवातीस दोन दिवस मग तीन, असे करीत १० वर्षांनंतर सलग नऊ दिवस उपवास केला तरच उपवासाचे फायदे मिळू शकतात. एरवी तीन  दिवसांपेक्षा जास्त दिवस कडकडीत उपवास केला तर नंतरच्या दिवसात वजन वाढवण्याकडे शरीराचा कल असतो.

शास्त्र काय सांगते?  व्यायाम, उपवास किंवा कुठलेही बदल यांची सुरुवात नेहमी छोट्या प्रमाणात करावी, त्यात हळूहळू वाढ करावी, असे शास्त्र सांगते. सवय नसताना अचानक काही करण्याने अपाय होण्याचीच शक्यता जास्त. अगदी छोटी सुरुवात, हळूहळू वाढ करताना जर काही त्रास जाणवला तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हरकत नाही.       कुणी सांगेल की, सुरुवातीस त्रास होतो मग सवय होते. यात खोटे काही नाही पण सारासार विवेक बुद्धी वापरून ‘स्वत:साठी कसा उपवास करावा किंवा करावा की न करावा’ हे प्रत्येकाने ठरवायला हवे. एकाला जमले म्हणजे सगळ्यांना जमेल असे नाही.

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री