शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोणते तेल आरोग्यास चांगले? कोणत्या तेलातून काय मिळते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:51 IST

बदलत्या जीवनशैलीत अनेकांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. अशा वेळी योग्य प्रकारच्या तेलाचा आहार असणे गरजेचे असते.

बदलत्या जीवनशैलीत आहारातील खाद्यतेलाचा वापर हा सार्वजनिक आरोग्याचा विषय ठरला आहे. कोणते तेल वापरावे आणि कोणते वापरू नये यासाठी आता आहारतज्ज्ञांची मदतीची गरज भासू लागली आहे. त्यानुसार काही आहारतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहारात तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी हिताचे ठरणार आहे.

आहारात तेलाचे प्रमाण कमी ठेवा बदलत्या जीवनशैलीत अनेकांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. अशा वेळी योग्य प्रकारच्या तेलाचा आहार असणे गरजेचे असते. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलाचे प्रमाण नेहमी कमी ठेवावे लागते. ज्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट’, ‘ओमेगा थ्री’ आणि ‘कॅरोटिन’ असते ते तेल निवडावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

कोणत्या तेलातून काय मिळते?मोहरीचे तेलमोहरीच्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड’ आणी ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘ओमेगा-३’ आणि ‘ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स’ असते. मोहरी आरोग्यासाठी उत्तम आहे.

शेंगदाणा तेलशेंगदाणा तेलामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स’ असतात. यामुळे हे तेल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

सोयाबीन तेल सोयाबीन तेलामध्ये भरपूर फॅटी ॲसिड असते. ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते. त्यामुळे वापर करतात.

करडई तेल करडईचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारच्या तेलात ‘मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे जास्त असते, तर दुसऱ्या प्रकारात ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असते.  पहिल्या प्रकारातील खाद्यतेल उपलब्ध आहे. 

ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असतात जे हृदय निरोगी ठेवतात. या तेलाचा स्मोक पॉइंट कमी असतो. त्यामुळे ते वापरण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. 

प्रत्येक तेलाचा गुणधर्म वेगळा असतो. यामुळे एकाच तेलाचा वापर करू नये. सहा महिने एकाच तेलाचा वापर केला तर त्यानंतर पुढील महिन्यासाठी दुसऱ्या तेलाचा वापर करावा किंवा तेलाचे एक पाकीट संपल्यावर दुसऱ्या तेलाचे पाकीट वापरावे. तेलाचे सत्त्व अधिक महत्त्वाचे असते.                                 - प्रियंका शिंदे, आहारतज्ज्ञ

आहारात नेहमी कमी तेलाचा वापर हिताचे ठरते. एकाच तेलाचा नेहमी वापर करू नये. शिवाय एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये. आहारात ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणा असे तेल प्रकार वापरणे उत्तम राहील.      - प्रणिता श्रीधर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न