शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

Cerebral Palsy: काय आहे सेरेब्रल प्लासी? ज्यामुळे सत्या नडेला यांच्या मुलाचं निधन झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:57 IST

सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मुलाच्या हालचाली आणि फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. हा आजार मेंदूच्या काही भागाला झालेल्या दुखापतीमुळे होतो.

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन नडेला यांचे निधन झाले आहे. ते २६ वर्षांचे होते आणि जन्मापासून सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे याची माहिती दिली. हॉस्पिटलच्या सीईओने आपल्या मंडळाला दिलेल्या संदेशात असे लिहिले आहे की झैन त्याच्या संगीतावरील प्रेम आणि त्याच्या सुंदर हास्यासाठी लक्षात राहील. 

काय आहे सेरेब्रल पाल्सी?सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मुलाच्या हालचाली आणि फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. हा आजार मेंदूच्या काही भागाला झालेल्या दुखापतीमुळे होतो, जो लहान मुलांमध्ये सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. हा रोग जन्माच्या आधी, जन्माच्या दरम्यान किंवा जन्माच्या नंतर लगेच होऊ शकतो. ही लक्षणे सर्व मुलांमध्ये भिन्न असू शकतात.

काय आहेत याची कारणं?सेरेब्रल पाल्सीच्या अनेक केसेसमध्ये याचं कारणं अद्याप अज्ञात आहे. मात्र खालील कारणांची शक्यता असू शकते असे तज्ज्ञ सांगतात.

  • गर्भावस्थेच्या सुरुवातील एखाद्या आजाराचा गर्भातील भ्रुणावर परिणाम पडला असेल तर
  • गर्भात भ्रुण विकसित होत असताना मेंदुपर्यंत रक्तप्रवाह थेट पोहोचला नसेल तर
  • गर्भधारणे दरम्यान बाळाच्या मेंदुतील रक्तस्त्राव
  • अपघातात लहान बाळाच्या डोक्याला मार लागणे
  • गर्भातील बाळाच्या मेंदुच्या आसपास सुज येणे

सेरेब्रल पाल्सीची लक्षणं

  • पेशींवर ताण येणे
  • पेशींचे आकुंचन होणे
  • शरीराच्या एका भागाची दुसऱ्या भागाच्या तुलनेत कार्य करण्याची क्षमता नसणे
  • जेवायला किंवा गिळायला त्रास होणे
  • बोलण्यात अडचण किंवा शब्द तोंडाद्वारे उच्चारण्यास अडचण निर्माण होणे
  • भरपूर लाळ येणे
  • गुडघे आतल्या भागात दुमडुन चालणे
  • चालालयला त्रास होणे
  • पेशींचं संतुलन न होणे

सेरेब्रल प्लासीवरील उपायबरेचदा सेरेब्रल प्लासीवर कायमचा इलाज करणं शक्य नाही. या आजारातून मुक्त होणं शक्य नसलं तरी वेळीच हा आजार समजला तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.

  • गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी- गर्भधारणेच्या काळात गर्भवती महिलांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेन आनंदी रहावे.
  • गर्भधारणेच्या काळातील लसीकरण- गर्भधारणेच्या काळात गर्भवती महिलांनी या काळात करण्यात येणारे लसीकरण अगदी काटेकोरपणे करावे. त्यात जराही हलगर्जीपणा करु नये.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स