शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : जर कुणी कोरोना व्हायरसच्या २ व्हेरिएंटने एकाचवेळी संक्रमित झाले तर काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:12 IST

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलं की, एकच व्यक्ती एकाचवेळी दोन व्हेरिएंटने संक्रमित असल्याच्या केसेस कमीच बघायला मिळतात.

बेल्जिअमच्या एका ९० वर्षीय महिला पहिली अशी व्यक्ती आहे, ज्यांना एकाच वेळी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दोन व्हेरिएंटने (Corona virus Variant) संक्रमित केलं आहे. ही महिला यावर्षी मार्चमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित झाली होती आणि तिच्यात अल्फा व बीटा दोन्ही व्हेरिएंट आढळून आले होते. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार क्लीनिकल मायक्रोबायोलॉजी आणि संक्रमित आजारांवर झालेल्या वार्षिक यूरोपिअन कॉंग्रेसमध्ये या अनोख्या केसवर चर्चा झाली.

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलं की, एकच व्यक्ती एकाचवेळी दोन व्हेरिएंटने संक्रमित असल्याच्या केसेस कमीच बघायला मिळतात. पण असं होणं जराही हैराण करणारं नाहीये. थोड्याच काळात अनेक लोकांकडून संक्रमित होणे ना अशक्य आहे आणि ना ही अशी बाब आहे जी पहिल्यांदा ऐकली.

जर एखादी व्यक्ती एकाच वेळी अनेक संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आली तर ती व्यक्ती एका व्यक्तीकडून किंवा सर्वांकडून संक्रमित होऊ शकते. व्हायरस शरीराच्या आत वाढण्यास वेळ लागतो आणि सर्व कोशिकांवर प्रभाव टाकतो. जोपर्यंत असं होतं तोपर्यंत ज्या कोशिका संक्रमित झाल्या नाहीत त्यावर दुसऱ्या स्त्रोतातून येणाऱ्या व्हायरसने संक्रमण होऊ शकतं. पॅथोजन विरोधात इम्यूनिटीला लढण्यासही वेळ लागतो. या दरम्यान या गोष्टीची शक्यता असते की, व्यक्ती एका व्यक्तीककडून किंवा जास्त लोकांकडून संक्रमित होईल. दोनदा संक्रमण एचआयव्हीच्या रूग्णांमध्ये सामान्य बाब आहे.

अशा केसेस समोर येण्याची शक्यता कमीच राहते. कारण प्रत्येक वेळी लोकांना भेटल्यावरच संक्रमण व्हावं हे गरजेचं नाही. संक्रमित व्यक्तीच्या कुणी संपर्कात आलं तर तो व्यक्ती संक्रमित होईलच असंही नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती एका व्यक्तीला किंवा अनेक संक्रमित लोकांना थोड्या वेळाने भेटली आणि सर्वातील व्हायरस त्याला संक्रमित करेल याची शक्यता कमीच राहते.

बेल्जिअमची महिला अशी पहिली महिला आहे जिच्यात असं लक्षण आढळून आलं. पण असंही होऊ शकतं की, जगात अशा अनेक केसेस असतील किंवा आता अशा केसेस समोर येत असतील. पण याची माहिती मिळणं कठीण असतं. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा व्यक्तीतील व्हायरस सॅम्पलचं जीनोम टेस्ट केली जाईल. 

घाबरण्याची गरज नाही

एकत्र  संक्रमणाचा रूग्णाच्या स्थितीवर वेगळा काही प्रभाव पडत नाही. भलेही व्हेरिएंट वेगळे असतील. सगळे व्हायरस रूग्णाच्या आरोग्यावर एकसारखा  प्रभाव टाकतात. त्यामुळे याचा काही फरक पडत नाही की व्हेरिएंट एका स्त्रोताचा आहे की, अनेक. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य