Benefits Of Skipping Rope: लठ्ठपणा केवळ भारताचीच नाही तर जगभरातील एक मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणा हा अनेक आजारांचं मूळ असतो. लठ्ठपणा वाढला तर हाय कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, कोरोनरी आर्टरी डिजीज, ट्रिपल वेसल डिजीज यांसारख्या समस्यांचा धोका असतो. त्याशिवाय वजन वाढल्यावर शरीराचा शेपही खराब होतो. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या
एकदा वाढलेलं वजन कमी करणं काही खायचं काम नाही. यासाठी स्ट्रिक्ट डाएट आणि हेवी वर्कआउट करावा लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांकडे इतका वेळ नसतो की, जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळावा. जिमसाठी पैसेही भरपूर द्यावे लागतात. अशात तुम्हाला कमी खर्चात वजन कमी करायचं असेल तर दोरीच्या उड्या हा एक चांगला पर्याय ठरतो.
वजन झटपट होईल कमी
बालपणी अनेकांना दोरीच्या उड्या मारणं आवडतं. हा लहान मुलांचा एक आवडीचा खेळ आहे. मात्र, मोठे झाल्यावर फार कुणी दोरीच्या उड्या मारत नाही. पण आता ही वेळ आली आहे की, पुन्हा एकदा ही एक्सरसाईज सुरू करावी. अनेक फिटनेस एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही रोज २० ते २५ मिनिटं सतत दोरीवरून उड्या मारण्याची सवय लावाल तर पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होईल. कारण या एक्सरसाईजनं रोज २०० ते ३०० कॅलरी बर्न होतात. तसेच शरीराचा स्टॅमिनाही वाढतो.
दोरीवरून उड्या मारण्याचे फायदे
- जे लोक रोज दोरीवरून उड्या मारण्याची एक्सरसाईज करतात त्यांचं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.
- जर तुम्ही रोज काही मिनिटं ही एक्सरसाईज केली तर अनेक आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.
- दोरीवरून उड्या मारल्यानं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. कारण यानं डिप्रेशन दूर करण्यास मदत मिळते.
- दोरीवरून उड्या मारल्यानं हाडंही आणि मसल्सही मजबूत होतात.
- दोरीवरून उड्या मारल्यानं लहान मुलांची उंची वाढण्यासही मदत मिळते.