(Image Credit : fit.thequint.com)
आपणा सर्वांना नेहमीच सल्ला दिला जातो की, भरपूर पाणी प्यावे. मात्र, कधी कधी आपल्या शरीरात फार जास्त पाणी जमा होतं आणि यामुळे चेहऱ्यावर सूज, जॉइंट्समध्ये वेदना, पोटावर चरबी जमा होणे असा समस्या होऊ लागतात. शरीरात पाणी जमा होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की, हार्मोनल बदल, किडनीचं योग्यप्रकारे काम न करणं, व्यायाम न करणे, गर्भावस्था इत्यादी. इतकेच नाही तर खाण्याच्या चुकीच्या सवयी, अधिक जंक फूडचं सेवन केल्यानेही शरीरात वॉटर वेट वाढू लागतं. हे वॉटर वेट कमी करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.
मिठाचं सेवन कमी करा
मिठाचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे आपलं शरीर अधिक पाणी शोषण करू लागतं. जास्त मीठ कोशिकांमध्ये जमा होऊ लागतं. यामुळेच शरीर फुगलेलं आणि जड दिसतं. अशात मिठाचं सेवन कमी केलं तर समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
शुगरचं सेवन कमी कार
कोणत्याही गोष्टीची अति करणं हे नुकसानकारक असतं हे तुम्हाला माहीत आहेच. त्याचप्रमाणे शुगरचं अधिक सेवनही वॉटर वेट वाढण्याला कारणीभूत ठरतं. अशात शुगरचं सेवन कमी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ब्लॅक कॉफीचं सेवन करा
ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असतं, याचा स्वभवा ड्यूरेटिक असतो. या कारणान तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येते. तसेच यामुळे तुमच्या शरीरातील जमा अतिरिक्त पाणी बाहेर निघू शकतं. मात्र, ब्लॅक कॉफीचं अधिक सेवन करणंही धोक्याचं ठरू शकतं. ब्लॅक कॉफीचं अधिक सेवन केल्याने तुम्हाला एंग्जायटी आणि असहजता होऊ शकते.
एक्सरसाइज करणे सोडू नका
वजन कमी करण्याच्या प्रोसेस दरम्यान एक्सरसाइज महत्त्वाची भूमिका निभावते. यासाठी तुम्ही फिरणे, धावणे, चालणे, स्वीमिंग, डान्सिंग इत्यादी गोष्टी करू शकता. याने शरीराची हालचाल कायम राहण्यास मदत मिळेत आणि सोबतच शरीराचं वजनही नियंत्रित राहतं.
कमी कार्ब असलेल्या आहाराचं सेवन
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर तुम्ही कमी कार्ब असलेल्या पदार्थांचं सेवन करायला पाहिजे. कार्बयुक्त पदार्थ वॉटर रिटेंशनचं कारण ठरू शकतात आणि याने वजन वाढू शकतं. मात्र, हे करत असताना आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरेल. कारण प्रत्येकाला एक डाएट प्लॅन सूट होईल असं नाही. असं असलं तरी फार कमी कार्ब असलेले पदार्थ खाणं देखील नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाण ठेवणं महत्त्वाचं आहे.
(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील उपाय फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)