शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेट लॉस हवाय? -मग काय खाल? लो कार्ब कि लो फॅट?...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 15:45 IST

गोंधळलात ना? मग हे वाचा आणि व्हा बारीक, स्लिम, ट्रीम आणि सुंदरही...

ठळक मुद्देआहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी झालं तर त्यामुळे भूक मंदावेलगुड कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढेलब्लड प्रेशर नॉर्मलवर येईलवजन कमी होईल आणि स्फूर्तीही येईल

- मयूर पठाडेमला जाड व्हायचंय, गलेलठ्ठ व्हायचंय, मस्त गोल गररगरीत, गोबरं होऊन सुंदर दिसायचंय... कोणाला तरी असं वाटतं का, म्हणजे जे अगदीच किरकाडे आहेत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी किंवा कोणी अभिनेता असेल तर त्या भूमिकेची गरज म्हणून काही जणांना जाड व्हायचं असेलही, पण तसं जाड होणं कोणालाच नको असतं. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आणि डॉक्टरांचंही म्हणणं असतं, एक वेळ तुम्ही बारीक राहिलात तरी चालेल, पण गलेलठ्ठ मात्र होऊ नका..त्यासाठीच आजकाल सर्वांचा प्रयत्न सुरू असतो. तरुणींना, स्त्रियांना तर आपल्या अंगावर एक मिलिमिटर जरी चरबी चढली किंवा साधं जेवण केलं तरी त्यांना लगेच वाटायला लागतं आपण ‘जाड’ झालो म्हणून!लगेच मग साºयांचे ‘बारीक’ होण्यासाठीचे उपाय सुरू होतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नपाणी, खाणंपिणं जवळपास सोडून देणं! पण बारीक होण्यासाठी खरोखर काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत हे कोणाला व्यवस्थित माहित असतं?तुम्हीच सांगा बरं, तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर तुम्ही काय कराल?कोणी म्हणेल, जेवण कमी करायचं, कोणी सांगेल फक्त फळांच्या रसावर राहायचं, कोणी सांगेल सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी करायचं, कोणी म्हणेल, ग्रीन टी प्या, गरम लिंबू पाणी प्या.. ज्याला जे वाट्टेल ते तो सांगेल. सांगतोही..पण खरं काय?बारीक व्हायचं असेल आणि त्याचे साइड इफेक्टसही तुम्हाला नको असतील तर आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल.पण त्यातही आणखी उपप्रश्न.आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करायचं की फॅट्सचं.. म्हणजे चरबीचं?दोन्हीही गोष्टी कमी किंवा प्रमाणात असल्या पाहिजेत, पण त्यातही कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केल्यानं जास्त फायदा होतो.कसा?कार्बोहायड्रेट्स कमी केल्यानं काय फायदा होतो?१- पहिली गोष्ट म्हणजे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी झालं तर आपली भूकही मंदावते. त्यामुळे सडपातळ होण्यास आपल्याला मदत होते!२- तुमच्या शरीरात जाणाºया कॅलरीजचं प्रमाणही कमी होतं.३- लो कार्बोहायड्रेट्सच्या आहाराचा केवळ इतकाच फायदा नाही, तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखरेचं प्रमाणही त्यामुळे कमी होतं.४- तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते कमी होऊन नॉर्मलवर येतं.५- तुमच्या शरीरातील गुड कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढतं आणि ते तुमच्या हृदयासाठीही चांगलं असतं.आपल्याला किती कार्बोहायड्रेट्सची गरज असते?* तसं म्हटलं तर त्याला काही नियम नाही.* आपलं वय काय, लिंग काय, आपलं बॉडी कम्पोझिशन कसं आहे, रोजची अ‍ॅक्टिव्हिटी कशी आहे, आपला पर्सनल चॉइस काय आहे, अशा अनेक गोष्टी त्यावर अवलंबून आहेत.* ज्यांची प्रकृती हेल्दी आहे, जे जास्त व्यायाम, कष्याची कामं करतात, त्यांना मात्र तुलनेनं जास्त कार्बोहायड्रेट्सची गरज असते..आता कळलं, वजन कमी करायचं, स्लिम, ट्रीम व्हायचं तर काय करायचं ते?..