शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विवेक शेट्टी उलगडणार मानवी मनाचा कप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 16:46 IST

विचारांतील सुस्पष्टता हे उत्क्रांतीचे सर्वांत मोठे स्वरूप आहे. मन खऱ्या अर्थाने जादू करू शकते, पण आपल्याला ते कसे वळवायचे हे जमायला हवे.

प्रेरणादायी वक्ते, योगी आणि जादूगार विवेक शेट्टी आता मानवी मनाबद्दल आपले अमूल्य विचार आणि ज्ञान डीडी सह्याद्रीवर प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच भागांचे प्रदर्शन येत्या 13 जून बुधवार सकाळी 8:00 वाजता प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने बोलताना ते म्हणाले की, विचारांतील सुस्पष्टता हे उत्क्रांतीचे सर्वांत मोठे स्वरूप आहे. मन खऱ्या अर्थाने जादू करू शकते, पण आपल्याला ते कसे वळवायचे हे जमायला हवे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गॅजेटसाठीचे सॉफ्टवेअर आपल्याला माहीत असते परंतु मानवी मनाचे सॉफ्टवेअर आपल्याला अद्याप गवसलेले नाही, हाच एक मोठा प्रश्न आहे. हेच आपले मन आहे जे आपल्याला आपली ध्येये साध्य कऱण्यासाठी आणि आयुष्याला सर्वोत्तम शक्यता साध्य करण्यासाठी मदत करते. आपण आपल्या मनाचा ताबा घेऊया. आपल्या शरीरातील पेशी आणि आपली पावले एकाच लक्ष्यावर केंद्रित करून आणि सहभागाच्या एकात्मतेने टाकूया. आपल्या आयुष्याची सर्वोच्च क्षमता वापरणे, त्याची सर्वाधिक क्षमता वापरणे हे आपल्यासाठीचे आपले कर्तव्य आहे.या भागांमधून मानवी मनाच्या सॉफ्टवेअरचे आणि त्याच्या विविध घटकांचे, त्याच्या प्रचंड क्षमता आणि वापर यांचे अत्यंत प्राथमिक ज्ञान मिळेल. रोजच्या सर्वसामान्य समस्या आणि परिणामकारक उपाययोजना यांच्यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवी मनांसाठी अत्यंत वेगळे प्रयत्न अनेक प्रेक्षकांसाठी खूप वेगळे ठरतील. आपण शरीराला व्यायाम देतो तसेच आपल्या मनालाही व्यायाम देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी किती जणांना मानवी मनासाठीचे व्यायाम आणि त्याची निरनिराळी उद्दिष्टे माहीत आहेत? या व्यायामांमधून आपल्या आयुष्याची दिशा बदलते आणि आयुष्यातील सर्वोच्च क्षमतेचा वाप करता येतो.  श्री. विवेक शेट्टी, हेड होंको, इंडस कम्युनिकेशन्स हे एक प्रेरणादायी वक्ते असून जीवन विज्ञान आणि गूढ ज्ञानावर त्यांचा भर असतो. ते मागील १५ वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांनी ४०० पेक्षा अधिक व्याख्याने आणि भाषणे दिली आहेत. त्यांनी ही भाषणे आघाडीचे अनेक कॉर्पोरेट समूह, व्यवस्थापन संस्था, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, आंतरराष्ट्रीय शाळा आणि विविध प्रकारच्या व्यवस्थापन फोरम्सवर दिली आहेत. ते मनाचे व्यवस्थापन आणि आवाज प्रशिक्षण या विषयांवर नियमितपणे वर्ग चालवतात. त्यांचे ट्विटरवर सुमारे दोन लाख वीस हजार अनुयायी आहेत आणि इन्स्टाग्रामवर एक लाख पंचवीस हजार अनुयायी आहेत आणि त्यांची संख्या प्रत्येक तासाला वाढते आहे. ते आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्या, बिझनेस हाऊस आणि सेलिब्रिटींना जाहिरात, जनसंपर्क, इव्हेंट मॅनेजमेंट आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये अद्ययावत सेवा देणाऱ्या ३६० अंशातील संवाद सेवांच्या इंडस कम्युनिकेशन्सचे प्रमुख आहेत. त्यांना जनसंपर्कातील आणि ब्रँडिंगमधील सामाजिक परिणाम साध्य करण्यातील सर्वोत्तमतेसाठी २०१६ चा नवशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांना संगीताची विशेष आवड आहे आणि देशभरात आघाडीच्या उत्सवांमध्ये आपले कार्यक्रम सादर कऱणाऱ्या सहा सदस्यांच्या बँडमध्ये प्रमुख गायक आहेत. २०१२ मध्ये त्यांना मेल़डियस व्हॉइस ऑफ दि इयरसाठी पंचम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांचा योगावर प्रचंड विश्वास आहे आणि ते दररोज न चुकता योगासने करतात. एक खऱ्या अर्थाने अष्टावधानी व्यक्तिमत्व असलेले विवेक शेट्टी व्यवस्थापन, प्रेरणा, योग लेखन, गायन आणि निवेदन अत्यंत सहजपणे आणि उत्तम पद्धतीने करतात.