शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'या' उपायाच्या मदतीने दम्यावर मिळवता येऊ शकतं नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:17 IST

अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे.

अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे. लहान लहान मुला-मुलींना कमी वयातही हा आजार होत आहे. ही फार गंभीर  बाब आहे. असे म्हटले जाते की, बदलत्या वातावरणात दम्याच्या रुग्णांनी स्वत:ची फार जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तर एका नव्या रिसर्चनुसार, जर दमा असलेल्या रूग्णांनी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण घेतलं तर सहजपणे ते बदलत्या वातावरणात ते स्वत:ची चांगली काळजी घेऊ शकतात. 

जर्नल ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅन्ड क्लीनिकल इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चनुसार, डाएटमध्ये कमी व्हिटॅमिन डी असल्याकारणाने दम्याने पीडित लहान मुलांची समस्या अधिक वाढू शकते. रिसर्चनुसार, ज्या लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांच्यांवर सिगारेट आणि अगरबत्तीचा धुराचा इतर मुलांच्या तुलनेत अधिक नकारात्मक प्रभाव पडतो. 

या रिसर्चमध्ये १२० दमाने पीडित शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग करण्यात आला होता. यात खासकरून तीन गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं. घरातील वायुप्रदूषणाचा स्तर, रक्तातील व्हिटॅमिन डी चं प्रमाण आणि दम्याची लक्षणे. इथे हेही जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं की, १२० मुलांपैकी अनेक मुलं-मुली हे जाडेपणाचे शिकार होते. 

या रिसर्चमधून जे निष्कर्ष निघाले त्यातून असं समोर येतं की, जर तुमच्या घरात वायु प्रदूषण जास्त असेल, पण दम्याने पीडित लहान मुलाच्या शरीरात व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी असेल तर त्याला या वातावरणाशी ताळमेळ बसवण्याक जास्त अडचण येणार नाही. तेच जर जाडेपणाने पीडित मुलांना जर व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण दिलं गेलं तर त्यांच्यात आणखी व्यापक परिवर्तन बघायला मिळतं. 

तसेच या रिसर्चमध्ये यावरही जोर देण्यात आला आहे की, उन्हात जास्त वेळ बसल्याने दम्याने पीडित मुलांना व्हिटॅमिन डी तर मिळेत पण त्यांच्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होईल. उन्हाच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी घेण्याऐवजी मासे, मशरूम, संत्री अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून-फळांमधून व्हिटॅमिन डी द्यावं. कारण यांचे काही साइड इफेक्टही होणार नाहीत. 

या रिसर्चच्या मुख्य अभ्यासिका सोनाली बोस सांगतात की, 'दमा एक असा आजार आहे ज्याचा कोणताही ठोस अशा उपचार नाही. मात्र अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, व्हिटॅमिन डी ने श्वाससंबंधी समस्या ठीक तर होणार नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं'.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स