शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Viagra Side Effects on Eyes: व्हायग्राबाबत मोठा खुलासा; कायमचा आंधळा करू शकतो, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 10:16 IST

Viagra Side Effects on Eyes: लैंगिक कमजोरीवर व्हायग्रा, सियालिस, लेविट्रा आणि स्टेंड्रा सारख्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतू त्याचा मोठा साईड इफेक्ट समोर आला आहे.

नपुंसकता घालविण्यासाठी किंवा शरीर संबंधांवेळी व्हायग्राचे सेवन केले जाते. हे औषध डॉक्टरांना विचारून किंवा न विचारता देखील घेतले जाते. मात्र, हे औषध एवढे धोकादायक आहे की तुमची नजर कमी करू शकते किंवा कायमचे आंधळे करू शकते. एका नव्या संशोधनात मोठा खुलासा झाला आहे. 

व्हायग्रासारख्या औषधांमध्ये एक असे रसायन आहे, जे डोळ्यांसाठी चांगले नाही. हे संशोधन JAMA Opthalomology मध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. संशोधकांनुसार व्हायग्रामध्ये फॉस्फोडाइस्टेरेस टाइप 5 इनहिबिटर्स असते जे डोळ्यांवर गंभीर परिणाम करते. एवढे की नजरही जाऊ शकते. 

इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी व्हायग्रा, सियालिस, लेविट्रा आणि स्टेंड्रा सारख्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, यांच्या वापरानंतर तुम्हाला डोळ्यांचा विकार उद्भवू शकतो. वेगवेगळ्या औषधांचे वेगवेगळे परिणाम असतात. या औषधांच्या सेवनाने अनेक प्रकाराचे साईड इफेक्ट होत होते. सीरियस रेटिनल डिटैचमेंट आणि रेटिनल वैस्कुलर ऑक्लूजन सारखे आजार होऊ शकतात. यावर हे संशोधन करण्यात आले आहे. 

संशोधकांनी यूएसमधील आरोग्य विम्यांतील दाव्यांची माहिती तपासली. यामध्ये 2.13 लाख लोकांना इरेक्टाइल डिसफंक्शनचे औषध घेण्याची सवय होती असे दिसले. त्यांची माहिती घेतली असता त्यांना डोळ्यांच्या एक ते तीन समस्या असल्याचे समोर आले. व्हायग्रासारखी औषधे न घेणार्‍यांच्या तुलनेत औषधे घेणाऱ्यांमध्ये आरडीचा धोका 1.5 टक्के वाढल्याचे दिसले. RVO चा धोका 2.5 टक्क्यांनी वाढतो. ION होण्याचे देखील चान्सेस दुप्पट होतात. 

SRD च्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक डोळ्यांसमोर डाग तरंगताना दिसतात. समोर पाहताना प्रखर प्रकाशाचे डाग दिसतील. RVO मध्ये अचानक नजर जाऊ शकते. नजर कमजोर होऊ शकते. ION मध्ये दोन्ही डोळ्यांची एकाच झटक्यात नजर जाऊ शकते. 

टॅग्स :Healthआरोग्य