शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुक्तीनंतर ३ महिन्यांनी लस घ्या; लस घेतल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करावं? मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 06:41 IST

अन्य आजारावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या व्यक्तींनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर ४ ते ८ आठ‌वड्यांनी लस घ्यावी.

ठळक मुद्देबाळाला स्तनपान करणाऱ्या माता कोरोनाविरोधी लस घेऊ शकतात.कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्यांची आधी अँटिजन चाचणी करण्याची गरज नाही.कोरोना चाचणी  निगेटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनी संबंधित व्यक्तीला रक्तदान करता येईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आणखी मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गावर मात करून घरी परतलेल्या व्यक्तीने नेमकी कधी लस घ्यावी, याबाबत असलेला संभ्रम आता दूर होणार आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती तीन महिन्यानंतर लस घेऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींसह इतर गटांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे लोकांमधील संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होणार आहे. 

लसीकरणाबाबत नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड (नेगव्हॅक) या विशेष गटाने सरकारला दिलेल्या सर्व सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या नवीन सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केल्या जातील.  

पहिल्या डोसनंतर बाधा झाल्यास तीन महिने थांबावेयामुळे बाधितांनी लस घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत अधिक स्पष्टता आली आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तिने कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा, असे नेगव्हॅकने म्हटले आहे. या सूचना जारी करण्याआधी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयाने कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी दोन लसींमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे इतका केला होता.

आता गुळणीतूनही काेराेना चाचणी

घशावाटे किंवा नाकावाटे स्राव घेऊन काेराेनाची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे साध्या गुळणीच्या माध्यमातून काेराेनाचे निदान करणे शक्य होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने हे संशाेधन केले आहे. आयसीएमआरने या संशाेधनाला मान्यता दिली असून, याचा लवकरच देशभरात वापर केला जाईल.  निरीच्या व्हायराॅलाॅजी विभागाचे डाॅ. कृष्णा खैरनार यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. काेराेना टेस्टिंगसंदर्भात हे संशाेधन उपयुक्त मानले जात आहे. या पद्धतीला ‘सलाइन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट’ असे नाव दिले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस