शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशयातील गाठी ठरताहेत गर्भधारणेसाठी अडथळा, तरुणांचे पहिले प्राधान्य करिअरला, नंतर लग्नाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:04 IST

उशिरा लग्न, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींमुळे महिलांमध्ये गर्भधारणेस अडथळा येत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई :  गेल्या काही वर्षात आपल्याकडे लग्न करण्याचे वय तिशीच्या पलीकडे गेले आहे. तरुण आणि तरुणी सध्या पहिले करिअरला प्राधान्य देत असून नंतर लग्नाचा विचार करताना दिसतात. उशिरा लग्न, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींमुळे महिलांमध्ये गर्भधारणेस अडथळा येत असल्याचे दिसून आले आहे.

तसेच या सगळ्या प्रक्रियेत गर्भाशयात जर गाठी (फायब्रॉइड्स) आढळल्या तर त्यांना गर्भधारणा करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा त्या गाठी काढल्यानंतर गर्भधारणा होते. या गाठीचा आकार इतका मोठा असतो की यामुळे महिलांचे पोट फुगलेले दिसते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपी गर्भाशयातील गाठी ही एक सामान्य समस्या आहे. अनेक महिला या समस्येला सामोऱ्या जातात.  गर्भाशयात आतील बाजूला गाठ असेल तर ती फार लवकर लक्षात येत नाही. तसेच त्यामुळे पोट फुगत नाही. गाठ बाहेरून असेल तर त्यामुळे पोट फुगते.  या गाठी ४ मिलीमीटरपेक्षा अधिक मोठ्या असतील तर त्या शस्त्रक्रिया करून काढून काढाव्या लागतात.  अनेक महिलांमध्ये या गाठी असल्याने गर्भधारणा होत नाही. सध्याच्या घडीला अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपीचा उपयोग केला जातो. यामध्ये टाके घ्यावे लागत नाही. त्यामुळे रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी होतो.  

काय असतात कारणे?    लठ्ठपणा  हार्मोम्सचे असंतुलन  अनुवंशिकतालक्षणे\ पोटात वेदना होणे  ओटीपोटात दुखणे  मासिकपाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव  मूत्राशयाचा संसर्ग  अंगावरून जाणे  अनियमित पाळी  कंबरदुखी

या गाठी गर्भाशयात कुठे आहे यावरून त्याचे निदान करून त्याची उपचारपद्धती निश्चित केली जाते. तसेच शस्त्रक्रिया कोणत्या आणि कशा पद्धतीने करायचे ठरविले जाते. गर्भधारणेस अडथळा निर्माण करणाऱ्या या गाठी काढल्यानंतर अनेक महिलाची गर्भधारणा व्यवस्थित झाली आहे. या गाठीचा आकार छोट्या बी पासून ते कलिंगडाएवढा कितीही असू शकतो. याकरिता लवकर निदान करून त्यावर उपचार करणे हा एकमेव उपाय आहे. गाठीच्या आजारावर उपाय करून रुग्ण व्यवस्थित होतो. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही.  - डॉ. आरती अढे, स्त्री रोग तज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल

टॅग्स :Healthआरोग्य