शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 18:30 IST

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधन आपल्या पूर्वजांनी या अगोदरच केले आहे. मात्र एका नवीन संशोधनानुसार हळदीमध्ये मेंदूची स्वत:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे सिद्ध झाले आहे.

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधन आपल्या पूर्वजांनी या अगोदरच केले आहे. मात्र एका नवीन संशोधनानुसार हळदीमध्ये मेंदूची स्वत:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे सिद्ध झाले आहे.संशोधकांनी हळदीमध्ये आढळणाऱ्या ‘टॅमरिन’ या घटकाचा अभ्यास केला. इंजेक्शनच्या माध्यमातून हा घटक उंदरांच्या शरीरात सोडण्यात आला. उंदरांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील पेशींच्या विकासासाठी आवश्यक असलेला भाग अधिक सक्रिय झालेला दिसला. हा निष्कर्ष जर्मनीतील इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरोसायन्स अँड मेडिसीनमधील ‘स्टेम सेल रिसर्च अँड थेरपी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.उंदरांच्या मज्जातंतूंच्या स्टेम सेल्सना टॅमरिनच्या द्रावणात बुडविल्यावर या पेशींमध्ये मेंदूतील कुठल्याही प्रकारच्या पेशी बदलण्याची क्षमता आल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. हळदीवरच्या या गुणकारी संशोधनामुळे अल्झायमर आणि मेंदूच्या इतर विकारांवर औषध बनविण्यात मदत होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.उंदरांवर केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढले असून, मनुष्याच्या मेंदूवर हळदीच्या होणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधक मारिया एडेल रुजर म्हणाले, ‘मानवासह इतर विकसित प्राण्यांमध्ये मेंदूतील बिघाड दुरुस्त करण्याची क्षमता नसते, मात्र मासे व इतर छोट्या प्राण्यांमध्ये ही क्षमता तुलनेने अधिक असते. या संशोधनामुळे मानवामध्येही ही क्षमता विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे.’