शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Unique Digital Health ID : युनिक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड बनवा, तुम्हाला मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या प्रक्रिया... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:21 IST

Unique Digital Health ID : या युनिक कार्डवरून कोणावर कुठे उपचार झाले, हे कळणार आहे. तसेच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहितीची नोंद या युनिक हेल्थ कार्डमध्ये केली जाईल.

नवी दिल्ली : आता आधारप्रमाणे हेल्थ कार्डही दिले जाणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड (Unique Health Card) बनवणार आहे. हे पूर्णपणे डिजिटल कार्ड असेल, जे अगदी आधार कार्डसारखे. आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला  त्यावर एक क्रमांक मिळेल, जो आरोग्य क्षेत्रात व्यक्तीची ओळख होईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टरांना तुमचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड समजेल.

या युनिक कार्डवरून कोणावर कुठे उपचार झाले, हे कळणार आहे. तसेच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहितीची नोंद या युनिक हेल्थ कार्डमध्ये केली जाईल. यामुळे रुग्णाला सर्वत्र फाईल सोबत घेऊन जावे लागणार नाही. डॉक्टर किंवा हॉस्पिटलला रुग्णाचा युनिक हेल्थ आयडी पाहून त्याची प्रकृती कळू शकेल आणि त्यानंतर त्याच्या आधारे पुढील उपचार सुरू करता येतील. 

या कार्डामुळे व्यक्तीला सरकारी योजनांचीही माहिती मिळेल. रुग्णाला आयुष्मान भारत अंतर्गत उपचार सुविधांचा लाभ मिळतो की नाही, हे या युनिक कार्डद्वारे समजणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच युनिक हेल्थ आयडी अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याशी संबंधित डेटाबेस तयार करेल. या आयडीसह, सर्व माहिती त्या व्यक्तीच्या वैद्यकीय रेकॉर्डमध्ये ठेवली जाईल. 

या आयडीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड पाहता येते. जर ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली तर ती व्यक्ती त्याचा हेल्थ आयडी दाखवू शकते. याआधी कोणते उपचार केले गेले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि कोणती औषधे यापूर्वी दिली गेली हे कळेल. या सुविधेद्वारे सरकार लोकांना उपचार इत्यादींमध्येही मदत करू शकणार आहे. 

यामध्ये त्या व्यक्तीचा आयडी तयार केला जाईल, त्याच्याकडून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन रेकॉर्डच्या मदतीने युनिक हेल्थ कार्ड तयार केले जाणार आहे. यासाठी सरकार एक आरोग्य प्राधिकरण तयार करेल, जो वैयक्तिक डेटा गोळा करेल. ज्या व्यक्तीचा हेल्थ आयडी बनवायचा आहे, त्याचे हेल्थ रेकॉर्ड गोळा करण्यासाठी आरोग्य प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाईल.

असे करा रेकॉर्ड रजिस्टर या आधारे पुढील काम केले जाईल. सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र किंवा नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी जोडलेले असे आरोग्य सेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीचा हेल्थ आयडी तयार करू शकतात. तुम्ही https://healthid.ndhm.gov.in/register येथे तुमच्या स्वतःचे रेकॉर्ड रजिस्टर करून तुमचा हेल्थ आयडी देखील तयार करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्य