(Image Credit : mirror.co.uk)
आजच्या धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोक फास्ट फूड किंवा जंक फूडच्या जाळ्यात अडकत आहेत. फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढतं किंवा हार्ट संबंधी समस्या होतात हे सर्वानाच माहीत आहे. पण आता समोर आलं आहे की, सतत जंक फूड खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टीही जाते. ब्रिटनमधून अशीच एक घटना समोर आली आहे.
Irishpost.Com च्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाची जास्त जंक फूड-फास्ट फूड खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी गेली. इतकेच नाही तर त्याची ऐकण्याची क्षमताही कमी झाली. रिपोर्टनुसार, हा मुलगा गेल्या १० वर्षांपासून सतत फास्ट फूड खात होता. तो रोज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये चिप्स, बर्गर, प्रोसेस्ड मांस आणि सॉस हे पदार्थ खात होता. ब्रिटनमध्ये फास्ट फूड खाऊन डोळ्यांची दृष्टी जाण्याची ही पहिलीच केस आहे.
मुलाला आहे रेअर इटिंग डिसऑर्डर
रिपोर्टनुसार, या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या मुलाला रेअर इटिंग डिसऑर्डर आहे. मेडिकल सायन्समध्ये याला अवॉइडेंट-रेसट्रिक्टिव फूड इनटेक डिसऑर्डर असं म्हणतात. या मुलाला शाळेत असतानापासून हा आजार आहे. या आजारामुळे त्याला भाज्या आणि फळं खाण्याची आवड होत नव्हती. त्यामुळे तो केवळ जंक फूड खात होता. रेअर इटिंग डिसऑर्डरमुळे या मुलाच्या शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे त्याच्यात न्यूट्रिशनल ऑप्टिक न्यरोपॅथी ही स्थिती निर्माण झाली.
न्यूरोपॅथीमुळे डॅमेज होता ऑप्टिक व्हेन्स
या न्यूरोपॅथीमुळे डोळ्यांच्या ऑप्टिक व्हेन्स डॅमेज होतात. ज्यामुळे हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी होत जाते. जर वेळेवर याची माहिती मिळाली नाही किंवा उपचार केले गेले नाही तर त्या व्यक्तीला डोळ्याने काहीच दिसणार नाही. जंक फूड खाल्ल्यामुळे मुलाची हाडे कमजोर झाली आहेत.
एक्सपर्ट काय सांगतात?
Irishpost.Com च्या रिपोर्टनुसार, या मुलाच्या केससंबंधी माहिती Annals of Internal Medicine नावाच्या जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आली आहे. Annals of Internal Medicine चे डॉक्टर डेनिस एटन यांनी सांगितले की, 'हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि लोकांमध्ये अशा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींबाबत फार कमी जागरूकता आहे, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टीला नुकसान होतं'.
डेनिस एटन यांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, 'या मुलाच्या केसमध्ये नवीन गोष्टी या होत्या की, तो १० वर्षांपासून फास्ट फूडवर जिवंत होता. त्याने फळं खाल्लीत ना भाज्या. सोबतच त्याच्या आजाराची माहितीही फार उशीरा मिळाली. तोपर्यंत त्याच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती.