शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

वजन कमी करण्यासाठी योगा करताय? तर ही हेल्दी ड्रिंक्स सोबत प्यायल्याने मिळेल लवकर रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 6:04 PM

योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात. योगासनांपासून मिळणारे फायदे वाढवण्यासाठी हे ड्रिंक्स नक्की घ्या..

गेल्या काही वर्षांतयोगासने आणि योगा करणे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी अनेकजण आता योगा करण्याचा मार्ग निवडत आहेत. योगाची आसने लवचिकता, सामर्थ्य, जीवनातील संतुलन आणि सुसंवाद साधण्यास मदत करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्हटल्याप्रमाणे योगा (Yoga For Health) म्हणजे शून्य बजेटसह आरोग्याची हमी आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. विशेषत: कोविड-19 महामारीनंतर लोक आता आपल्या आरोग्याविषयी जास्त सजग झाले आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम महत्त्वाचा असला तरी चांगला आहार राखणे आणि हायड्रेटेड राहणे हे एकंदर आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात. योगासनांपासून मिळणारे फायदे वाढवण्यासाठी हे ड्रिंक्स नक्की घ्या..

मध मिसळलेले गरम पाणी :दिवसाच्या सुरुवातीला एक कप गरम पाण्यात मध घालून ते प्या (Warm water And Honey). आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ही सर्वोत्तम कृती आहे. मधाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्वरित वाढते. हे केवळ तुमची पचनसंस्था सुधारत नाही तर जलद गतीने वजन कमी करण्यास देखील मदत करेल.

नारळ पाणी :अनेक योग साधक त्यांच्या योगा सत्रांनंतर नारळाचे पाणी (Coconut Water) पितात. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे तणावाचे व्यवस्थापन करण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करते. हे तुम्हाला त्वरित ऊर्जा देते आणि तुमच्या त्वचेसाठीदेखील ते उत्तम असते.

आल्याचा चहा :सर्दी झाल्यास आपल्यापैकी अनेकजण आल्याचा चहा (Ginger Tea) पितात. आल्याचा चहा जगभरात विशेषतः भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर प्रभावी औषधी वनस्पती म्हणून ओळखला जातो. आल्याचा चहा श्वसन, पाचक आणि रक्ताभिसरण प्रणालींमध्ये मदत करतो. आल्याचा चहा घेतल्याने वजनावर फायदेशीर प्रभाव पडतो असेही संशोधनात दिसून आले आहे.

लिंबू पाणी :दिवसभरात पुरेसे पाणी न पिल्याने बऱ्याच लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. योगासनापूर्वी लिंबू पाणी (Lemon Water) पिल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealthcare Budget 2018आरोग्य बजेट २०१८