शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ‘जे जे’मध्ये ट्रेनिंग सुरू; सिम्युलेटरचा वापर, नवीन वर्षात श्रीगणेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:26 IST

रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांचा चमू रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतात. हे नेहमीचे दृश्य. मात्र, या चमूमध्ये आता रोबोचाही समावेश होणार आहे. नव्या वर्षात जे जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जेजेतील अध्यापकांना दिले जात आहे. त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जात आहे. 

रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु, या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात यासाठी आता जेजेमध्ये त्याची सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने जे जेमध्ये रोबोही घेतला आहे. 

त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महामुंबई क्षेत्रात रोबो खरेदी करणारे ‘जेजे’ हे पहिले रुग्णालय ठरले आहे.

वेदना कमी होण्यास मदत शस्त्रक्रियेच्या प्रचलित पद्धतीला छेद देत बहुतांश ठिकाणी आता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. पोटावर एक किंवा दोन छिद्रे करून या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यापुढे जाऊन प्रगत देशांत करण्यात येणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयांत होत आहेत.     या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो.

रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात करण्याआधी डॉक्टरांना प्रशिक्षित हाेणे गरेजेचे आहे. रोबोच्या तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी कार्यशाळेत उपस्थित राहावे लागते. त्यानंतर मृतदेहावर रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक केले जाते. या प्रक्रियेनंतर रोबोटिक सर्जन म्हणून डॉक्टरांना प्रमाणपत्र दिले जाते. यासंदर्भातील सर्व नियोजन रोबो पुरविणारी कंपनी करते. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत परिचारिका व टेक्निशियनलाही प्रशिक्षण बंधनकारक आहे. - डॉ. अजय भंडारवार, विभागप्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, सर जे जे रुग्णालय