शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

मृत्यूनंतरही पुन्हा जगायचंय? जर्मनीतील स्टार्टअप २ कोटींमध्ये देतंय जिवंत होण्याची सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:39 IST

टुमॉरो बायो ही कंपनी १.७४ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या ग्राहकांना मृत्यूनंतरही पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन देते.

Tomorrow Bio : जर्मनीतल एक स्टार्टअप तु्म्हाला अमर बनवू शकणार आहे. बर्लिन येथील स्टार्टअप टुमॉरो बायो ही कंपनी मृत्यूनंतर मानवी शरीरांचे जतन करणारी भविष्यकालीन सेवा पुरवत आहे, ज्याचा उद्देश लोकांना जगण्याची दुसरी संधी देणे आहे. टुमॉरो बायोनुसार लोक क्रायोप्रिझर्वेशनमध्ये स्वतःला गोठवू शकतात आणि ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. २००,००० डॉलर्स (१.७४ कोटी रुपये) मध्ये, कंपनी शरीराला अत्यंत कमी तापमानात गोठवून संपूर्ण  क्रायोप्रिझर्वेशन देते, ज्यामुळे पेशींचे नुकसान रोखण्यास मदत होते. मृत्यूनंतर लगेच प्रक्रिया सुरू करण्यासाठी टुमॉरो बायो २४/७ आपत्कालीन स्टँडबाय टीम चालवते ज्यामुळे शरीर लवकरात लवकर कंपनीकडे पोहोचते.

भविष्यातील वैद्यकीय प्रगतीमुळे कधीतरी जतन केलेल्या व्यक्तींना पुनरुज्जीवित करणे शक्य होईल अशी टुमॉरो बायोची या मागची कल्पना आहे. टूमॉरो बायो ही युरोपातील पहिली क्रायोनिक्स लॅब आहे जी मानवी शरीर गोठवते आणि मृत्यूनंतर त्यांना पुन्हा जिवंत करत. त्याची किंमत १.७४ कोटी रुपये असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला फक्त त्याचा मेंदू गोठवायचा असेल तर त्याची किंमत ६७.२ लाख रुपये आहे.

‘बायोस्टॅसिस’साठी मृतदेह क्रायोप्रिझर्वेशनमध्ये मायनस १९८° सेल्सिअस तापमानात ठेवण्याची कंपनीची कल्पना आहे. या तापमानाला सर्व जैविक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवल्या जातात. त्यानंतर कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या प्रक्रिया भविष्यात स्वेच्छेने पुन्हा सुरू करता येतात आणि मृत्यूचे कारण बरे करता येते.

पण क्रायोप्रिझर्वेशन ही प्रक्रिया गोठवण्यासारखी नाही. त्यात बर्फात गोठवण्या प्रक्रिया नाही कारण ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. तर बर्फाच्या स्फटिकांची निर्मिती रोखण्यासाठी एक विशेष क्रायोप्रोटेक्टंट द्रावण (द्रव नायट्रोजन) सोडले जाते. एकदा तापमान शून्य अंशांपेक्षा कमी झाले की शरीर गोठवले जात नाही. ते क्रायोप्रिझर्व केले जाते. जर असं केलं नाही तर शरीरातील ऊती नष्ट होतात.

कंपनीच्या वेबसाईटनुसार, टुमॉरो बायोला असे जग निर्माण करायचे आहे ज्यात लोक कुठे आहेत, कोण आहेत आणि त्यांच्या आर्थिक संसाधनांची पर्वा न करता त्यांना किती काळ जगायचे आहे ते निवडू शकतील.

माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीचा दावा आहे की सहा लोक आणि पाच पाळीव प्राण्यांना आधीच क्रायोप्रिझर्वेशन अंतर्गत ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेसाठी पैसे भरुन ६५० हून अधिक लोक रांगेत उभे आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होताच कंपनी ही प्रक्रिया सुरू करते. विविध युरोपीय शहरांमध्ये  असलेल्या खास रुग्णवाहिकांमधून त्यांना स्वित्झर्लंडमधील मुख्य सेंटरमध्ये पोहोचवते. या कामासाठी कंपनीने बर्लिन, अॅमस्टरडॅम आणि झुरिच येथे स्टँडबाय टीम तैनात केल्या आहेत.

व्यक्तीचा मृतदेह स्वित्झर्लंडमधील रॅफ्झ येथील मुख्य केंद्रात हलवला जातो आणि पुढील दहा दिवसांसाठी -१९६ अंश सेल्सिअस (-०.८२ अंश फॅरेनहाइट) तापमानात द्रव नायट्रोजनने भरलेल्या ३.२ मीटर उंच स्टीलच्या व्हॅक्यूम-इन्सुलेटेड कंटेनरमध्ये ठेवला जातो.

टॅग्स :Healthआरोग्यGermanyजर्मनी